इचलकरंजीत लाखो लिटर पाणी वाया

इचलकरंजीत लाखो लिटर पाणी वाया

७५३८८

इचलकरंजीत लाखो लिटर पाणी वाया
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : येथील नाट्यगृह परिसरातील जलकुंभातून ओव्हर फ्लो होऊन लाखो लिटर पाणी आज बाहेर पडले. यामुळे ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. एका कर्मचाऱ्याच्या हयगयीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्यामुळे परिसरातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
या जलकुंभावरून काल रात्री एका भागात पाणीपुरवठा केला. त्यानंतरही जलकुंभात थोडे पाणी शिल्लक होते. आज सकाळी जलकुंभ भरण्याचे काम सुरू केले. सुमारे साडेतीन तास जलकुंभ भरण्यास लागतात. त्यानंतर जलकुंभ भरल्यानंतर पाणी बंद करण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्याकडे दिली. पण त्याच्या हयगयीमुळे सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ जलकुंभातील पाणी ओव्हर फ्लो होऊन बाहेर पडत होते. त्यामुळे परिसरात पाण्याचे तळ बनले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर पाणी बंद केले. शहरात सतत पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणी बचतीचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत असते. असे असताना आज लाखो लिटर पाणी मानवी चुकेमुळे वाया गेले. याबाबत नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com