इंडिया आघाडी-महिला मेळावा

इंडिया आघाडी-महिला मेळावा

फोटो ः 75305

पुरोगामी विचार दिल्ली दरबारी पाठविण्याचा निर्धार
इंडिया आघाडीचा महिला मेळावा; शाहू छत्रपती महाराजांना साथ देण्‍याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या माध्यमातून पुरोगामी विचार दिल्ली दरबारी पाठविण्याचा निर्धार आज इंडिया आघाडीच्या महिला मेळाव्यात करण्यात आला. केशवराव भोसले नाट्यगृहात मेळावा झाला. सुरक्षित महिलांसाठी, सामाजिक न्याय टिकविण्यासाठी, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांना टिकविण्यासाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना साथ द्या, आता नाही तर पुन्हा नाही, असेही आवाहन करण्यात आले.
सागरगीत मंचतर्फे गीत सादर करण्यात आले. येथे हात उंचावून वज्रमूठ करून महाराजांच्या विजयाचा निर्धार केला. यामध्ये याज्ञसेनीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शांतादेवी डी. वाय. पाटील, आमदार जयश्री जाधव, सरोज पाटील (माई ), सरलाताई पाटील, स्मिता माने , शुभांगी पवार, तेजस्विनी पाटील, दश्‍मीता जाधव, निलोफर आजरेकर, भारती पवार, पद्मजा तिवले, मेधा पानसरे, संध्या घोटणे, प्रा. मंजुश्री पवार यांच्यासह महिलांचा सहभाग होता.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘हाताला साथ द्या. दूरदृष्टी ठेवून काम करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा हा वारसा आता दिल्ली दरबारी पाठवूया, भाजपाला हद्दपार करूया.’
सरोज पाटील म्हणाल्या, ‘हात जोडून विनंती करते, आता चूक करू नका. भाजपला मतदान करू नका. भाजपचा हा विषारी वेल उखडून काढण्याची वेळ आता आली आहे. शाहू, फुले आंबेडकरांचे विचार तेवत ठेवयाचे असतील तर शाहू छत्रपती महाराजांना मतदान करा. ’
प्रा. पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी यांच्या काळातही ते दिल्लीसमोर झुकले नाहीत. आजही तशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे छत्रपती घराण्याला राजकरणात यावे लागले.’ पानसरे म्हणाल्या, ‘राज्यघटना टिकविण्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे.’
माजी नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, संध्या घोटणे, पद्मजा तिवले, ॲड. कल्पना माने यांनी मनोगत व्यक्त केले.

चौकट
तुतारी आणि मिस कॉल
मोबाईल क्रमांक सांगून त्यावर मिस कॉल देऊन श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना साथ देण्याचे आवाहन यावेळी पूजा नाईकनवरे यांनी केले. समृद्धी गुरव या मुलीने ही हातात तुतारी घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com