खूनांच्या घटनांनी शहर हादरले

खूनांच्या घटनांनी शहर हादरले

०००००००००००००००
खुनांच्या घटनांनी शहर हादरले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : लोकसभा आचारसंहितेची धामधूम सुरू असताना आज दिवसभरात एका पाठोपाठ घडलेल्या खुनांच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरले. सकाळी आठच्या सुमारास नालेसफाई करताना सावित्रीबाई फुले हॉस्पिटल परिसर हुतात्मा पार्कजवळच्या ओढ्यात पुरुषाचा शीर नसलेला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला. शनिवार पेठेतील उच्चशिक्षित तरुणीचा ‘लिव्ह इन रिलेशन’ च्या वादातून खून करण्यात आला. त्यात पोलिसांनी मुलीची आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे. मुलगी ‘लिव्ह इन रिलेशन''मध्ये राहत असल्याच्या रागातून हा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वर्चस्व वादातून यादवनगरातील तरुणाचा रंकाळा टॉवर येथे पर्यटकांच्या वर्दळीच्या ठिकाणी हल्लेखोरांनी नंग्या तलवारी व एडका नाचवत खून केला. लागोपाठ घडलेल्‍या घटनांनी पोलिसांचीही तारांबळ उडाली तर दुसरीकडे शहर हादरून गेले होते.
............................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com