सणांच्या काळात एकही लाभार्थी वंचीत ठेऊ नका ः मोहिनी चव्हाण

सणांच्या काळात एकही लाभार्थी वंचीत ठेऊ नका ः मोहिनी चव्हाण

75377

‘सणांच्या पार्श्वभूमीवर
रेशन वाटप सुरळीत ठेवा’

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ ः ‘‘रमजान ईद, गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या पार्श्वभूमीवर एकही लाभार्थी रास्त धान्यापासून वंचित राहाणार नाही याची काळजी घ्या;’’ अशी सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिल्या. आज त्यांनी रास्त भाव धान्य दुकानबदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
चव्हाण म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणूक तसेच रमजान ईद, गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आगामी काळात आहे. या कालावधीत जिल्ह्यातील धान्य वाटप सुरळीत ठेवा. कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहाणार नाही, याची काळजी घ्या.’ यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी पॉज मशीनच्या तांत्रिक अडचणीत बदल मुद्दा उपस्थित केला. रेशन दुकानदारांच्या शासनाकडून देय रकमा लवकर द्यावे, अशी मागणी केली. त्यास जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, श्रीपती पाटील, पांडुरंग सुभेदार, दीपक चौगुले, महादेव कदम, आनंदा लादे, नींबू पाटील विलास देशपांडे, दिनकर पाटील, राजन पाटील, बाबूराव पाटील, महेश नेले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com