हॉस्पीटलमधील चोरीप्रकरणी चालकासह दोघांना अटक

हॉस्पीटलमधील चोरीप्रकरणी चालकासह दोघांना अटक

हॉस्पिटलमधील चोरीप्रकरणी
चालकासह दोघांना अटक

कोल्हापूर, ता. ४ ः रुक्मिणीनगरातील हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी चालकासह दोघांना अटक करण्यात आली. कॅश काऊंटर उचकटून करण्यात आलेल्या १ लाख ८५ हजारांच्या रोख रकमेच्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी अमोल सदानंद जाधव (वय ३३) आणि अमित मारुती फराकटे (४२, रा. दोघे रा. भोसलेवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. अमित फराकटे हा सध्या हॉस्पिटलकडे चालक म्हणून नोकरीला होता, तर अमोल जाधव हा पूर्वी याच ठिकाणी काम करत होता. दोघांनी मिळून ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख ६० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com