Kalamba Jail kolhapur
Kalamba Jail kolhapuresakal

Kalamba Jail : कळंबा कारागृहात कैद्यांचा पोलिस सुभेदारासह कैद्यावर हल्ला; हल्लेखोर जर्मनी टोळीतील

कळंबा कारागृहात (Kalamba Jail) आलेल्या विशेष पथकाने तपासणीत मोठ्या प्रमाणात मोबाईल जप्त केले आहेत.
Summary

याप्रकरणी १४ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर : कळंबा कारागृहात (Kalamba Jail) आलेल्या विशेष पथकाने तपासणीत मोठ्या प्रमाणात मोबाईल जप्त केले आहेत. याबाबतची माहिती आरोपी लहू रामचंद्र ढेकणे याने अधिकाऱ्यांना दिल्याच्या संशयावरून जर्मनी टोळीतील (Germany Gang) सदस्यांनी संबंधित आरोपीसह पोलिस सुभेदारावर हल्ला केला. यात सुभेदार उमेश शामू चव्हाण (वय ५१, रा. चव्हाण कॉलनी, कळंबा) हे गंभीर जखमी झाले. शनिवारी कळंबा कारागृहाच्या सर्कल नंबर ७ मधील बॅराक नंबर ४ मध्ये ही घटना घडली.

Kalamba Jail kolhapur
Hatkanangale Lok Sabha : आमदार आवाडेंच्या बंडखोरीमागे नेमका कोणाचा हात? राजकीय क्षेत्रात चर्चेला ऊत

याप्रकरणी १४ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोकातील आरोपी सुनील अशोक कोडुगळे याच्यासह बसवराज महादेव तेली, उमर इसाक बागवान, जमीर सलीम शेख, सोहेल सिराज शेख, उमर अमीर खान मुल्ला, संग्राम बाबू रणपिसे, अक्षय अशोक घाटगे, किरण आप्पासाहेब वडर, अफताब जमाल मोमीन, शाहरुख आझाद शेख, विजय सुरेश जाधव, तन्वीर मुसा पठाण, दत्तात्रय काशीनाथ अस्वरे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे व मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.

Kalamba Jail kolhapur
Kolhapur Lok Sabha : 'पृथ्वीवरील कोणतीच शक्ती मंडलिकांचा विजय रोखू शकत नाही'; हसन मुश्रीफांचं थेट आव्हान

३० मार्चपासून कळंबा कारागृहात आलेल्या विशेष पथकाने कारागृहाची झडती घेत २५ हून अधिक मोबाईल, चार्जर, बॅटरी असे साहित्य जप्त केले. ही माहिती कारागृहातील बंदी लहू ढेकणे याने कारागृह प्रशासनाला दिल्याचा संशय संशयित आरोपींना होता. शनिवारी सकाळी सर्कल क्रमांक ७ मधील बॅराक नंबर ४ मध्ये असणाऱ्या ढेकणे यास त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू असताना सुभेदार उमेश चव्हाण यांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात ते जखमी झाले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com