Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal

Kolhapur Crime : एक लाखासाठी आईनेच पोटच्या मुलीला गोव्यात विकलं; काय आहे प्रकार? मध्यस्थाला अटक

एक लाख रुपयांसाठी आईनेच (Mother) पोटच्या एक वर्षीय मुलीला गोव्यातील व्यक्तीला विकल्याचे उघडकीस आले.
Summary

मुलीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक गोव्याला पाठविल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर : एक लाख रुपयांसाठी आईनेच (Mother) पोटच्या एक वर्षीय मुलीला गोव्यातील व्यक्तीला विकल्याचे उघडकीस आले. एका मध्यस्थाच्या मदतीने स्टॅम्प करून मुलीचा ताबा देण्यात आला. संबंधित मुलीच्या वडिलांनी या संदर्भात फिर्याद दिली. त्यावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी (Laxmipuri Police) मुलीची आई, तिचा मित्र सचिन आण्णाप्पा कोंडेकर (४०, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थ किरण गणपती पाटील (३०, रा. केर्ली, करवीर) यांना अटक केली आहे.

त्याचवेळी गोव्यातील (Goa) फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नोरोव्हा (४४, रा. न्युरा ओ ग्रॅंड चर्चजवळ, तिसवाडी, उत्तर गोवा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक गोव्याला पाठविल्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

Kolhapur Crime News
UPSC Exam Result : नागरी सेवा परीक्षेत कोल्हापुरातील जमादार, पाटील, कांबळे चमकले; 'यूपीएससी'त राज्यातून मोटवानी प्रथम

याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादीचा विवाह (Marriage) २०१८ मध्ये झाला. तो सध्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये एका कंपनीत खासगी नोकरी करतो. या दाम्पत्याला मुलगा आहे. वर्षभरापूर्वी त्यांना मुलगी झाली. सीपीआरमध्ये प्रसूतीनंतर फिर्यादी कुटुंबासह पट्टणकोडोली येथे भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहू लागला. तेथे काही कारणाने पती-पत्नीत वाद झाला. त्यामुळे पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.

सासूने दिली माहिती.....

यानंतर पतीने वारंवार पत्नीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण ती प्रतिसाद देत नव्हती. त्याच्या सासूने १३ एप्रिलला त्याला फोन करून त्याच्या पत्नीने त्याची मुलगी कोणाला तरी दत्तक दिल्याचे सांगितले. यामुळे फिर्यादीने पट्टणकोडोलीत जाऊन चौकशी केली, तेव्हा त्याची पत्नी इचलकरंजीत मित्रासोबत राहात असल्याचे समजले.

Kolhapur Crime News
Satara Lok Sabha : साताऱ्यात शिवेंद्रराजेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; उदयनराजेंबाबत नाराजी, शिंदेंना मिळणार सहानुभूती?

मुलगी पाळणाघरात असल्याची बतावणी....

पतीने पत्नीला इचलकरंजीत जाऊन जाब विचारला. त्यावेळी तिने आष्टा (जि. सांगली) येथे पाळणाघरात मुलीला ठेवल्याची खोटी माहिती दिली. त्याने मुलीला बघायचे असल्याचे सांगितल्यानंतर तिने पाळणाघराचे नियम असून, महिन्यानंतर मुलीला बघायला मिळेल, अशी बतावणी केली. यावर त्याने पाळणाघरात जाण्याचा आग्रह धरल्याने तिने उलटसुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली.

पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी....

फिर्यादीला मुलीविषयी चिंता वाटू लागल्याने त्याने पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगताच पत्नीने मुलीला देताना केलेली नोटरीची प्रत त्याला दाखवली. या कागदपत्रांच्या आधारे दत्तकपत्र होत नसतानाही तिने मुलीला दिल्याने हा सर्व प्रकार उजेडात आला. पत्नीने मध्यस्थीच्या मदतीने करवीर तहसील कार्यालय परिसरात २७ मार्चला पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून स्वतःची मुलगी जुएला नोरोन्हाला दिल्याचे समोर आले. फिर्यादीच्या पत्नीने स्वतःच्या फायद्यासाठी मुलीस फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नोरोन्हा यांना विकल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

Kolhapur Crime News
Sangli Lok Sabha : 'विशाल पाटलांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा'; संजय राऊतांची आक्रमक भूमिका

रुग्णालयातील कर्मचाऱ्याची मध्यस्थी

गोव्यातील नोरोन्हा दाम्पत्य वंध्यत्व चिकित्सेसाठी कोल्हापुरात येत होते. त्या रुग्णालयात किरण पाटील काम करतो. या दाम्पत्याला मूल दत्तक घेण्याचा सल्ला देत त्याने सचिन कोंडेकर याची ओळख करून दिली. फिर्यादीची पत्नी मुलीसोबत कोंडेकरकडे राहत होती. पाटील आणि कोंडेकरने मुलगी गोव्यातील दाम्पत्याला देण्याचा प्रस्ताव मांडत मध्यस्थी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com