रवळनाथ घराला घरपण देणारी संस्था

रवळनाथ घराला घरपण देणारी संस्था

GAD244.JPG
79600
सांगली ः रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांचा सत्कार प्रा. डॉ. प्रभा पाटील यांच्या हस्ते झाला. शेजारी एम. एल. चौगुले, वसंतराव जुगळे, बी. व्ही. ताम्हनकर, डॉ. आर. जी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
-------------------------------------------
रवळनाथ घराला घरपण देणारी संस्था
प्रा. डॉ. वसंतराव जुगळे : ‘रवळनाथ’तर्फे डॉ. जुगळे यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २५ ः मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी रवळनाथकडून सुलभ कर्जसुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रवळनाथ ही सर्वसामान्यांच्या घराला घरपण देण्याचे पुण्यकर्म करणारी संस्था आहे, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. वसंतराव जुगळे यांनी काढले.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे सांगली शाखा कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांचा शाखा सल्लागार प्रा. डॉ. प्रभा पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
डॉ. जुगळे म्हणाले, ‘कुशल नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली रवळनाथची यशस्वी वाटचाल सुरू आहे. संस्थेला मल्टिस्टेट दर्जा प्राप्त आहे. भविष्यात ही संस्था देशभर शाखा विस्तार करेल आणि सहकार चळवळीला बळ देईल.’ डॉ. योजना जुगळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याकडे असलेली शोधवृत्ती आणि माणसांची पारख यामुळेच रवळनाथचा वटवृक्ष बहरत असल्याचे सांगितले. शाखा सल्लागार प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, रिना जुगळे, श्री. धनंजय गोंदकर, शाखाधिकारी श्रेयस गाडवे आदी उपस्थित होते. शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हनकर यांनी स्वागत केले. शाखा सल्लागार प्रा. सतीश हेरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. प्रभा पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com