झुणका भाकरी प्रसाद वाटप

झुणका भाकरी प्रसाद वाटप

महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे
झुणका भाकर वाटप
कोल्हापूर, ता. २५ : श्री महालक्ष्मी भक्त मंडळ आणि श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे चैत्र पौर्णिमेस श्री जोतिबाची यात्रा करून श्री अंबाबाईच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी श्री अंबाबाई मंदिरामध्ये श्री रामाचा पार येथे मोफत झुणका भाकर कार्यक्रम झाला. सुमारे दोन हजार भक्तांनी या झुणका भाकरी प्रसादाचा लाभ घेतला.
छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी, श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते प्रसाद वाटप केले. संस्थेचे खजिनदार संजय जोशी, कार्यवाह प्रमोद भिडे, संचालक एस. के. कुलकर्णी, संजय बावडेकर, सुनील जोशी, वैभव मेवेकरी, किरण धर्माधिकारी, हर्षदा मेवेकरी, ज्योतीताई जाधव, राजेश सुगंधी, प्रशांत तहसीलदार, सुनील खडके, तन्मय मेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com