माने टुडे 
डे

माने टुडे डे

79682
इचलकरंजी : येथील खोतवाडी परिसरात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत बोलताना सुरेश हाळवणकर. व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर.

विकासासाठी माने यांना
विक्रमी मताधिक्य द्या
सुरेश हाळवणकर : खोतवाडी येथे मेळावा
इचलकरंजी, ता. २५ : देशात नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदी सरकार येणार आहे असून भागाच्या विकासासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे खासदार धैर्यशील माने यांना विक्रमी मताधिक्य द्या, असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी केले.
खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे होते. या वेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी सत्यजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ॲड. अनिल डाळ्या यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अमृता भोसले, मिश्रीलाल जाजू, सरपंच विशाल कुंभार आदींची भाषणे झाली.
मेळाव्यात पदाधिकारी निवडी घोषित करून पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आकाशा मुल्ला, वैशाली पोवार, दगडू खोत, गजानन नलगे, शेखर पाटील, नरेंद्र पोटे, राहुल कांबळे, सचिन कांबळे, रवी सासणे, महेश खोत, नाना कांबळे, बापू चोपडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com