बिंदू चौकातील बंद्यांची नेत्रतपासणी

बिंदू चौकातील बंद्यांची नेत्रतपासणी

79687
बिंदू चौकातील
बंद्यांची नेत्रतपासणी

कोल्हापूर, ता. २५ ः बिंदू चौक सबजेलमधील बंद्यांसाठी नेत्र शिबिराचे आयोजन केले होते. कारागृहातील बंदिस्त १३० बंद्यांच्या तपासणीतून डोळ्यांच्या समस्या व उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
बुधवारी सकाळी बंद्यांसाठी तपासणी शिबिर झाले. कारागृहाचे प्र-अधीक्षक ए. डी. खैरे यांनी प्रास्ताविक करून तपासणीसाठी आलेले डॉ. प्रसन्न आराध्ये, व्यवस्थापक रवींद्र मोहिते व इतर सहकाऱ्यांचे स्वागत केले. रवींद्र मोहिते यांनी कारागृहातील डोळ्यांची निगा कशी राखावी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात कारागृहातील ०७ महिला बंदी व १२३ पुरुष बंद्यांचे डोळे तपासण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com