लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना भत्ता मंजूर

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना भत्ता मंजूर

निवडणूक भत्ता जुना; शासन निर्णय नवा
मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दरपत्रक जाहीर; वाढ करण्याची मागणी

प्रवीण देसाई-सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मतदानापासून मतमोजणीपर्यंत नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली आहे. त्यानुसार प्रशिक्षणेही होत आहेत. त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून निवडणूक भत्ता मंजूर झाला असून, त्याचे दरपत्रकही जाहीर केले आहे. हे दर पाहिल्यास ते जुनेच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे निवडणूक भत्त्याचा दर जुना व शासन निर्णय नवा असे म्हटल्यास वावगे होणार नाही. दरम्यान, निवडणूक कामात असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून भत्त्यामध्ये थोडी वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
निवडणूक कामात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता दिला जातो. २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या भत्त्याप्रमाणेच या निवडणुकीत भत्ता मंजूर केला आहे. इतर गोष्टींचे दर वाढले असले तरी या भत्त्याचा दर दहा वर्षांपूर्वीचाच असल्याचे दिसत आहे. यामुळे निवडणूक कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून या भत्त्यामध्ये वाढ करावी, असा सूर उमटत आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नुकताच याबाबत शासन निर्णय काढून नवीन दरपत्रक जाहीर केले आहे.

ठळक चौकट
नवीन दरपत्रक असे
- क्षेत्रीय दंडाधिकारी - एकदाच १५०० रुपये
- मतदान केंद्राध्यक्ष/मतमोजणी पर्यवेक्षक (दिवसाला) - ३५० रुपये
- मतदान अधिकारी/मतमोजणी सहायक (दिवसाला) - २५० रुपये
- चतुर्थश्रेणी कर्मचारी (दिवसाला) - २५० रुपये
- आयकर निरीक्षक (एकदाच) - १२०० रुपये
- सूक्ष्म निरीक्षक (एकदाच) - १००० रुपये
- फिरते व्हिडीओ पथक, व्हिडीओ निरीक्षण पथक, लेखा पथक, नियंत्रण कक्ष, कॉल सेंटरमधील कर्मचारी, प्रसारमाध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा, फिरते पथक, स्थिर देखरेख पथक, खर्च नियंत्रण सेल यामध्ये काम करणारे वर्ग-१/ वर्ग-२चे अधिकारी (एकदाच)- १२०० रुपये
-वर्ग-३ अधिकारी (एकदाच)- १००० रुपये
-वर्ग-४ कर्मचारी (दिवसाला)- २००

चौकट
आहार भत्ता १५० रुपये
मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी/ कर्मचारी यांच्यासह पोलिस अधकारी / कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, वनरक्षक दल, ग्रामरक्षक दल, एनसीसी कॅडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक यांच्यासाठी भोजनाची पाकिटे किंवा सौम्य आहारासाठी आहार भत्ता म्हणून १५० रुपये प्रत्येक दिवसासाठी मिळणार आहे. या भत्त्याचा २०१४ व २०१९ च्या निवडणुकीतही इतकाच होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com