शिवराजमध्ये बीबीए, बीसीए प्रवेश परीक्षा मार्गदर्शन वर्ग

शिवराजमध्ये बीबीए, बीसीए प्रवेश परीक्षा मार्गदर्शन वर्ग

शिवराजमध्ये बीबीए, बीसीए
प्रवेश परीक्षा मार्गदर्शन वर्ग
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : येथील शिवराज महाविद्यालयात बीबीए, बीसीएच्या प्रवेश परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू केले आहेत. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अनिल कुराडे म्हणाले, ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एआयसीटीइ अंतर्गत सुरू करण्यात येत आहे. बीबीए, बीसीएच्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांनी या प्रवेश परीक्षेकडे अडथळा म्हणून न पाहता संधी म्हणून पाहावे. तसेच आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.’
प्रा. बी. एस. पठाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व डॉ. आर. एस. निळपणकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. के. एस. देसाई, प्रा. आझाद पटेल, प्रा. विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. बीबीए विभागप्रमुख प्रा. आर. डी. कमते यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com