सदर

सदर

डांगडूंग...
कार्टून- ढोलकीवाला 79864
----------------
अगं बाई!
इलेक्शन-बिलेक्शन
----
(ढोलकीवाल्यानं ढोलकीच्या आऱ्या चापून आवळल्या. आमी तुणतुणं सम्राट, तुणतुण्याची तार ताणवली, बोटानं सूर बघितला. पेटी मास्तरनं एकवार सूर आजमावला आणि इशारा केला, तसा सगळ्यांनी ताल धरला).
‘नमन : गण वंदना.. गणनायका ... गौरी सम्राटाऽऽ, नुसतं नमन सुरू झालं. इतक्यात गवळणी लाजत, मुरडत, ठुमकत पडद्यामागनं बाहेर आल्या आणि पुढं.)

सोंगाड्या : अगं ! अगं !, थांब वाईज, कोण गं तू, कुण्या गावची गं तू?, अप्सरा, रंभा, आणिक मेनका.
गवळण : ये मुडद्या! तू कोण्ण रं, ईचारणार?
सोंगाड्या : आत्ता रं हिंच्या, आमच्याच इलाक्यात, आमाला ईचारायची चुरी.
गवळण : आरं ये!, मुडदा बसिवला तुझा घाटावर, चुरी बिरी काय म्हंत्यो, मी, चोर हाय का? रं बेलट्या तोंडाच्या.
सोंगाड्या : मी या इलाक्याचा फौजदार हाय, फौजदार. माझं काम हाय, नाव, गाव, खूण, निशाणी, बाया, बापंय आणिक कायबाय तपासायचं.
गवळण : आस्सं हाई व्हय, फौजीदार सायेब ! पर का ? तपासायचं तुमास्नी.
सोंगाड्या : आता कशी आली गाडी रुळावर आँ... मला तपासायची म्हंजी, इकडं इलेक्शन, हाय इलेक्शन.
गवळण : इलेक्शन आसतिया की, शाळंत जाऊन मत देतुया आणि गावचं आण्णा सरपंच व्हुत्यात ते.
सोंगाड्या : अगं माझे आये! ती गावची इलेक्शन आसतिया.
गवळण : मंग, ही कसली इलेक्शन?
सोंगाड्या : अगं, ही इलेक्शन दिल्लीची, खासदारकीची.
गवळण : मग, गावची इलेक्शन आणि यात काय येगळंपण?
सोंगाड्या : अगं!, पेल्यात गारगार ईच्चुवाणी पाणी, मताला नोट, प्यायाला घोट, जेवढी डोकी, तेवढी खोकी. खिसा हुतोया गरम.
गवळण : सायेब! ते सगळं खरं, पर आमा बायकांना काय मिळतं?
सोंगाड्या : बायकांना, खणा-नारळाची चवड.. कुकरची शिट्टी आणि डोक्याला पट्टी.
गवळण : आस्सं हाय व्हय! ह्येलाच म्हणत्यात व्हई इलेक्शन.
सोंगाड्या : व्हई, व्हई इलेक्शन, धाब्याचं कमिशन, बिलाला मशीन.
गवळण : सायेब तरी म्यां म्हंती, आमचं बाळ्या, आठ-पंधरा दिस सांन्चं पोरं गोळा करतंय आणि फाट्यावर जातंय.
घरला येतंय, दाबात म्हणतंय, म्या, जेवणार नाय.
सोंगाड्या : कळलं, का बया, जा आता बाजाराला उशीर हुतोया.
गवळण : कळलं.. कळलं...
(गवळण गेली ठुमकत, मुरडत. पडदा पडला...)
-----------------------------
तुमचाच जिवाभावाचा मैतर ऊर्फ तुणतुणं सम्राट.
-सबना मास्तर.
----------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com