अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी वृद्धास कारावास

अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी वृद्धास कारावास

KOP24M79798 ः आरोपी मनोहर सुतार
अल्पवयीन मुलीचा विनयभंगप; वृद्धास कारावास
कोल्हापूर ः चॉकलेटच्या अमिषाने अल्पवयीन मुलीली घरात बोलावून विनयभंग केल्याप्रकरणी मनोहर श्रीमंत सुतार (वय ६६) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवले. आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. नोव्हेंबर २०१९ मध्ये घडलेल्या गुन्ह्याची नोंद करवीर पोलिसांत झाली होती.
दारासमोर खेळणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीला आरोपीने चॉकलेटच्या अमिषाने घरी बोलावले. यानंतर तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनाला येताच मुलीच्या आईने करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com