सहजसेवा ट्रस्ट

सहजसेवा ट्रस्ट

सहजसेवा ट्रस्ट अन्नछत्राचा
दोन लाखांवर भाविकांना लाभ
कोल्हापूर, ता. २५ ः नुकत्याच झालेल्या जोतिबा यात्रेमध्ये सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राचा लाभ दोन लाखांवर भाविकांनी घेतला. सलग चोवीसाव्या वर्षी अन्नछत्राचा हा उपक्रम चोवीस तास राबवण्यात आला.
नंदादीप नेत्रालयातर्फे भाविकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. सीपीआर हॉस्पिटल व वारणा येथील महात्मा गांधी हॉस्पिटल यांच्यातर्फे रक्तदान शिबिर झाले. त्यातून अडीचशे बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. यात्रा काळात कार्यरत शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्था, पोलिस व यात्रा यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था व व्यक्तींना फूड पॅकेट्स देण्यात आली. अन्नछत्रासाठी राबणाऱ्यांचा ट्रस्टतर्फे गौरव झाला. दरम्यान, प्लास्टिकमुक्त यात्रेसाठीही ट्रस्टने पुढाकार घेतला.

मोफत स्त्रीरोग निदान
चिकित्सा शिबिर रविवारी
कोल्हापूर, ता. २५ ः येथील स्वस्तीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत स्त्रीरोग निदान व चिकित्सा शिबिर होणार आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महावीर जयंतीच्या निमित्ताने शुक्रवार पेठेतील जैन मठात रविवारी (ता.२८) सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर होणार आहे. महावीर वैद्यकीय सेवा संस्था, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिर होईल.
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी स्त्रीरोग विशेष तज्ज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. अशोक पोळ, सुरेश रोटे, भरत शेंडुरे, डॉ. पद्मश्री बिंदगे, डॉ. संदेश अडमुठे, डॉ. सुनीता पाटील, डॉ. कावेरी चौगुले, डॉ. मंगला कागले रुग्णांची तपासणी करतील. डॉ. अनुजा पाटील, डॉ. शस्मिता सनके-जैन, डॉ. तेजस्विनी गाठ, डॉ. मनीषा भोजकर समुपदेशन करणार आहेत. शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकुमार बिंदगे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com