शहरात आजपासून पाणी पुरवठा

शहरात आजपासून पाणी पुरवठा

79892
कोल्हापूर : महापालिकेकडून आय. टी. आय. वसतिगृह येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण करण्यात आले.

पाणी आजपासून पूर्ववत
दुरुस्तीचे काम पूर्ण; काही भागात टँकरद्वारे पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडून येणाऱ्या पाईपलाईनचे कळंबा रोडवरील आय. टी. आय. वसतिगृह येथे क्रॉस कनेक्शनच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता. २५) रात्री उशिरा पूर्ण झाले. महापालिका जलअभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत थांबून हे काम पूर्ण केले. त्यामुळे शुक्रवार (ता.२६) पासून शहरातील ए, बी, वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान गुरुवारी दिवसभरात पाणीपुरवठा होऊ न शकल्याने महापालिकेतर्फे चार टँकरद्वारे २४ फेऱ्या करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात आला.
पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडून येणाऱ्या ११०० मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनला २ एप्रिलला आय. टी. आय. वसतिगृहानजीक क्रॉस कनेक्शनचे काम केले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या वेल्डिंगमधूनच पाणी गळती सुरू झाली. यानंतर पुन्हा वेल्डिंगमधील गळती काढण्याचा प्रयत्न झाला; परंतु तो फोल ठरला. या ठिकाणी असणाऱ्या सिमेंट आणि लोखंडी पाईपचे जॉईंट झालेच नाही. त्यामुळे गुरुवारी सिमेंटची पाईप काढून ३५ मीटर पूर्णपणे लोखंडी पाईपलाईन टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले. हे काम दोन दिवस चालणार असल्याने गुरुवारी व शुक्रवारी शहरातील ए व बी वॉर्डात होणार नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते; परंतु जलअभियंत्यासह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत जलवाहिनीला दुरुस्ती करून सिमेंटपाईपऐवजी ३५ मीटर लोखंडी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले.
-----------------
चौकट
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात
यापूर्वी दोन वेळा पाईपलाईनच्या गळती दुरुस्तीच्या कामाला अपयश आल्याने शहरातील काही भागात पाणीपुरवठा दोन-दोन दिवस झाला नव्हता; परंतु आता हा प्रश्‍न कायमचाच मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेकडून सिमेंट पाईप ऐवजी लोखंडी पाईप टाकून ती टाकीला जोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी दिवसभरात युद्धपातळीवर काम करून रात्री उशिरा हे काम पूर्ण झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com