भाज्यांचे देठ, फळांच्या साली आमच्याकडे द्या

भाज्यांचे देठ, फळांच्या साली आमच्याकडे द्या

भाज्यांचे देठ, फळांच्या साली आमच्याकडे द्या

निसर्ग मित्र संस्थेचा पुढाकार ः जागतिक गाढव दिनानिमित्त संकलन, चारा म्हणून उपयोग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः गाढवाच्या दुधात विविध औषधी गुणधर्म असतात. लहान मुलांसाठी तसेच मधुमेहींसाठी गाढवाचे दूध जीवनदायी असते. गाढवाच्या दुधात असणारी पोषकतत्त्वे इतर दुधाळ जनावरांपेक्षा अधिक असतात. या दुधात असलेल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे त्याला बाजारात मोठी मागणी असते. उकीरड्यावरील प्लास्टिक कचरा खाऊन होणारा गाढवांचा मृत्यू टाळण्यासाठी निसर्ग मित्र संस्थेच्या परिवाराने भाजीचे देठ, फळांच्या सालीचे संकलन करून गाढवांच्या मालकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आले. ८ मे या गाढव दिनानिमित्त याविषयी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
अत्यंत कष्टाळू आणि आज्ञाधारक, पण तितकाच दुर्लक्षित राहिलेला प्राणी म्हणजे गाढव. महाराष्ट्रात धोबी, वडार, कुंभार, कैकाडी समाजातील लोक प्रामुख्याने गाढवे पाळतात. दैनंदिन रोजीरोटीसाठी गाढवांचा सांभाळ करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात; परंतु वाढते शहरीकरण, यांत्रिकीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे गाढवांचा वापर कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त १८ हजार गाढवे (पशुगणना २०१९) असल्याचा अंदाज आहे.
गाढव संवर्धन, निवारा, आहार, आरोग्य, प्रजनन याविषयी सहजासहजी माहिती उपलब्ध होत नाही. काही पशुपालक व पशुवैद्यकीय यांच्या निरीक्षणानुसार सहसा उकीरड्यातच चरणारी गाढवे अन्नाच्या आशेने प्लास्टिक वेष्टणेदेखील खातात आणि पोटफुगीच्या विकाराने मृत्युमुखी पडतात. अशा बहुगुणी प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ८ मे रोजी ‘जागतिक गाढव दिन’ साजरा केला जातो. यावर्षी दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित, निसर्गमित्र संस्थेतर्फे कृतिशील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोल्हापूर शहर व परिसरात ३०० हून अधिक गाढवे असून, त्यांच्यासाठी आपल्या घरातील जेवणापूर्वीचा कचरा (निवडलेल्या भाज्यांचे देठ, पाने, फळांची साल आदी) अंदाजे एक किलो गाढवांसाठी चारा म्हणून द्यावयाचा आहे. असा कचरा फक्त कागदी पिशवीत व्यवस्थित बांधून दिल्यानंतर संस्थेतर्फे आपल्याला साठवणुकीच्या धान्यात टाकण्यासाठी ‘कडूनिंबाच्या गोळ्या’ भेट देण्यात येणार असल्याचे निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी कळवले आहे.
....
चौकट...
गाढवांसाठी चारा येथे स्वीकारला जाईल
अनिल चौगुले, २८२३/४८ बी वॉर्ड, महालक्ष्मी नगर, कोल्हापूर, सतीश वडणगेकर, कुंभार गल्ली, शाहूपुरी.
खंडेराव हेरवाडे, मु. पो. शिरोळ, जि. कोल्हापूर (एस.टी. स्टॅंडमागे) याठिकाणी चारा संकलन करण्यात येईल.
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com