आरोग्य संवाद यात्रेची सांगता

आरोग्य संवाद यात्रेची सांगता

आरोग्य संवाद यात्रेची सांगता
गडचिरोली-गडहिंग्लज यात्रा ः विदर्भ-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ ः शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व आरोग्यदूत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोलीपासून सुरू झालेल्या आरोग्य संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता आज गडहिंग्लजमध्ये झाली. गरीब सर्वसामान्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ व्हावा, या हेतूने ही यात्रा काढली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती कक्षाचे राज्यप्रमुख राम राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘गुढीपाडवादिनी या यात्रेचे उद्‍घाटन ठाण्यात झाल्यानंतर गडचिरोलीपासून यात्रेला प्रारंभ झाला. विदर्भ-मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा गेली. मुख्यमंत्री सहायता निधी व महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, गरजू व गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी विविध आरोग्य योजनांच्या व्यापक प्रसार व जागृतीसाठी यात्रेचे नियोजन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पावणेदोन वर्षात दुर्धर आजारग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २३० कोटींचा निधी वितरित केला. महाविकास आघाडीच्या कालावधीत हाच निधी २०५ कोटी खर्च झाला. हा निधी मिळवण्यासाठी गरजूंनी थेट अर्ज करावा,’ असे आवाहन यात्रेच्या माध्यमातून केले. प्रत्येक जिल्ह्यात यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत झाले. आरोग्यदूतचे बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी, कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अमोल पाटील, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, धनश्री देसाई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय संकपाळ आदी उपस्थित होते.
-------------
दलाली बंद केली
श्री. राऊत म्हणाले, ‘या संवाद यात्रेद्वारे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देतो म्हणून विदर्भ-मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दलाली सुरू होती. प्रत्येकी दहा हजारांची मागणी होत होती. त्याला आळा घालण्यात यश आले. अनेक दवाखान्यांत महात्मा फुले आरोग्य योजनेत उपचार केले तरी वरून पैसे घेतले जातात. या दोन्ही योजनांवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करीत आहे. नागरिकांनी योजनेबाबत वैद्यकीय मदत कक्षाकडे तक्रार करावी.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com