देशाला समृद्ध अध्यात्मिक वारसा

देशाला समृद्ध अध्यात्मिक वारसा

GAD292.JPG
80506
गडहिंग्लज ः श्री संत बाळूमामा भंडारा महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी ईश्वर महास्वामी, रमेश रिंगणे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
देशाला समृद्ध आध्यात्मिक वारसा
श्री ईश्वर महास्वामी ः बाळूमामा मंदिरात भंडारा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ ः समृद्घ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जोरावर देश जगाचे नेतृत्व करत असल्याचे प्रतिपादन हंचनाळ योगाश्रमाचे महेशानंद ऊर्फ ईश्वर महास्वामी यांनी केले.
येथील श्री संत बाळूमामा मंदिरात बाळूमामा-हालसिद्धनाथ देवस्थान सेवा संस्थानतर्फे आठवा वार्षिक भंडारा महोत्सव सुरू आहे. यानिमित्त आयोजित श्री संत बाळूमामांच्या जीवनावरील अमृत चरित्राच्या संगीत प्रवचनात ते बोलत होते. भजनासह होणारे हे प्रवचन १० मेपर्यंत चालणार आहे.
ईश्वर महास्वामी म्हणाले, ‘आपल्या देशाला समृध्द प्राचीन आध्यात्मिक अशी संत-महंतांच्या सामाजिक सुधारणांची प्राचीन परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये श्रीसंत बाळूमामांचे कार्य उच्चतम व आदर्शवत आहे. आपले जीवन सुखी समाधानी जगण्यासाठी श्री संत बाळूमामा अनुकरणीय आहेत. देशाला आध्यात्मिक, सांस्कृतिक व आयुर्वेदिकतेचा वारसा आहे.’
श्री संत बाळूमामा देवस्थान सेवा संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, सचिव चंद्रकांत सावंत, जवाहर घुगरे, बापू उपराटे, सुभाष देवगोंडा, बसवाणी मगदूम, रावसाहेब पाटील, आप्पासाहेब बेळगुद्री, संदीप रिंगणे, निजगुणी स्वामी, निंगाप्पा भमानगोळ आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com