विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुल रूममध्ये निवड

विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या दहा विद्यार्थ्यांची इंडो जर्मन टुल रूममध्ये निवड

80578
...
इंडो जर्मन टुल रूममध्ये
दहा विद्यार्थ्यांची निवड
विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाचे यश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील इंडो जर्मन टुल रूम या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाला. यामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्राममधील दहा विद्यार्थ्यांची या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्राची पावसकर, ऋषिकेश पदमन, संदीप आंभोरे, संदीप बोलंगे, सुजित रणदिवे, मोहनीश लोहार, अजय गुजले, प्राची चव्हाण, निकिता दुधाळ, शुभम कारीदकर यांचा समावेश आहे. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर गणेश पाटील, सहायक प्राध्यापक सतीश काळे, सागर पोर्लेकर यांनी केले.
आतापर्यंत मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्रॅममधील विद्यार्थ्यांची ॲक्वा चिल सिस्टिम्स इंडिया, आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रॉनिका हाय टेक मशीन टुल्स, मेहता कॅड कॅम सिस्टीम्स, बीव्हीजी इंडिया, घाटगे पाटील इंडस्ट्रीज, पारिख मेटाकास्ट, व्हर्साटाइल आदी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोग्रामचे समन्वयक डॉ. अभिजित कोळेकर, सेंट्रल प्लेसमेंट सेल ऑफिसर डॉ. राजन पडवळ यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com