डीकेटीईच्या सात विद्यार्थ्यांची निवड

डीकेटीईच्या सात विद्यार्थ्यांची निवड

ich293.jpg
80592
इचलकरंजी ः डीकेटीई टेक्स्टाईलचे इन्सीजनीएन होम या कंपनीत निवड झालेले विद्यार्थी.

डीकेटीईच्या सात विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईलमध्ये शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांची देशातील नामवंत इन्सीजनीएन होम या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. मुंबई, ठाणे येथे हे विद्यार्थी विविध पदांवर लवकरच रुजू होणार आहेत.
इन्सीजनीएन होम प्रा.लि. ही फॅशन होम टेक्स्टाईलमधील अघाडीची उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. नॉटिका, रॉस, डोमनी कॅरेफोअर, लिनॉल, सिमन्स आदी त्यांचे जगप्रसिद्ध ग्राहक आहेत. कंपनीमार्फत आयोजित रिटर्न टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू अशा अनेक फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता यावरून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली. रसिका गुरव, प्रियंका कुंभार, ऋत्वीक फडतारे, देवल धोतरकर, मिताली कांबळे, अनुष्का चौगुले व अंकिता हासबे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com