वृक्षगणनेला अडथळा

वृक्षगणनेला अडथळा

लोगो महापालिका

नको परवानगीची झंझट, वृक्ष गणणेत कटकट
खासगी जागेतील सर्वेक्षणास नागरिकांचा विरोध; २५ प्रभागांतच काम पूर्ण
---


कोल्हापूर, ता. २९ ः आपल्या जागेतील वृक्ष रेकॉर्डवर नको अशा विचाराने खासगी जागेतील वृक्ष गणनेसाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. एकदा तो रेकॉर्डवर आला तर पुढे महापालिकेत परवानगीची झंझट मागे लागणार हे त्यापाठीमागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे शहरात गेल्या महिन्यापासून संथपद्धतीने गणना सुरू असून २५ प्रभागांमधील केवळ ५० हजार वृक्षांची गणना करता आली आहे.

नऊ वर्षांनंतर शहरातील वृक्षगणना होत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण करून वर्कऑर्डर दिली होती. ॲबेल संस्थेने ६५ लाखांत सहा महिन्यांत काम करण्याचे ठरवले होते. पण, त्यानंतर गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून ओळखपत्र तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे गणनेला मार्च महिना उजाडला. संस्थेने ४० कर्मचारी नेमले असून, शहराच्या मध्यवस्तीतील प्रभाग पहिल्या टप्प्यात निवडले आहेत. या दीड महिन्यात २५ प्रभागांमधील गणना पूर्ण झाली असून, त्याचे अहवाल तयार करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या ५३ उद्यानांमध्ये तसेच इतर ठिकाणी अतिदुर्मिळ, दुर्मिळ तसेच जुने वृक्ष आहेत. खासगी जागांमधील वृक्ष मोजले जाणार आहेत. १० सेंटिमीटर जाडीचा बुंधा असलेले व १० फूट उंची असलेले वृक्ष मोजले जातात. त्यातून ५० हजारांवर वृक्षांची गणना झाली असून, पुढील टप्प्यात वेगवेगळ्या भागात गणना केली जाणार आहे. पण, त्यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना खासगी जागेतील वृक्ष मोजण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. महापालिकेच्या रेकॉर्डवर आपल्या जागेतील वृक्ष आला तर भविष्यात तो तोडावा लागला तर महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी वृक्ष तोडणे योग्य आहे का यासाठी पाहणी केल्यानंतर निर्णय दिला जातो. त्यासाठी वेळ तर जातोच, शिवाय तोडू नये असे सांगितले तर आपल्या जागेत काही करता येणार नाही याची भीती आहे. यामुळे आपल्या जागेतील वृक्ष रेकार्डवर नको असाच विचार नागरिकांचा दिसून येत असल्याचे गणना करणाऱ्यांमधील सूत्रांनी सांगितले.

चौकट
अनेकांची परस्पर तोड?
शहराच्या मध्यवस्तीत मुळात जागा किमती असताना झाडामुळे जर तिचा वापर करता येणार नसेल तर ते गणनेपूर्वीच झाडे तोडण्याचा प्रकार काही ठिकाणी होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून योग्य कार्यवाही झाली तरच या प्रकाराला आळा बसेल.

कोट
वृक्षगणनेचे काम संथ सुरू आहे. त्याबाबत संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच खासगी जागेत जर गणना करण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य होत नसेल तर महापालिकेकडून आवश्‍यक मदत केली जाईल.
-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com