जिल्हा परिषद मतदान जनजागृती

जिल्हा परिषद मतदान जनजागृती

६० टक्केपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रावर लक्ष्य
जनजागृसाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रमः कार्तिकेयन एस.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : जिल्ह्यात २०१९ मधील लोकसभा निवडणूकीत २५० मतदान केंद्रावर ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे. या मतदान केंद्रावर जास्ती-जास्त मतदान होण्यासाठी मतदान जनजागृती उपक्रम राबवला जात आहे. आठवडी बाजार, गावातील यात्रा, ग्रामपंचायत हद्दीतील महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज दिली.
कार्तिकेयन एस. म्हणाले, ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ७०.८८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील २५० मतदान केंद्रावर ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे. त्यामुळे यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीत ही टक्केवारी वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आठवडी बाजार, यात्रा व गर्दीचे ठिकाणी पथनाट्य करुन मतदान जनजागृती केली जाणार आहे. गावागावात मतदान जनजागृतीचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या गावात राजकीय पक्षांशी संबंधित नसणाऱ्या खेळाडू, कलावंत, प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांग व्यक्ति, ज्येष्ठ नागरिकांनी मतदान जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी करुन घेतले पाहिजे. मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प आणि व्हिल चेअर वाहतुक व्यवस्था केली पाहिजे. मतदान जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करावे, अशाही सूचना दिल्या आहेत.

चौकट
मतदान जनजागृती पथकाला बक्षीस
यावर्षी मतदानामध्ये ज्या ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर ६० टक्केपेक्षा अधिक मतदान नोंदवल्यास बुथ पातळीवरील जनजागृती करणाऱ्या पथकाला बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये, ८५ टक्केपेक्षा जास्त मतदान होणाऱ्या केंद्रांना सुवर्णपदक, ८१ ते ८५ टक्के मतदान होणाऱ्या केंद्रांना रौप्य पदक आणि ७० ते ८० मतदान झालेल्या केंद्रावरील जनजागृती पथकाला कास्य पदक दिले जाणार असल्याचेही कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com