नाला गाळ

नाला गाळ

80625
----

नाले सफाईतून ४२६२ टन गाळ उठाव
महापालिकेतर्फे मोहीम; प्लास्टिक व अन्य कचरा १०० टन

कोल्हापूर, ता.२९ : महापालिकेने शहरात नालेसफाईतून आजअखेर ४२६२ टन गाळ काढला आहे. त्यात फ्लोटींग मटेरियल, प्लास्टिक व तत्सम कचऱ्याचे प्रमाण १०० टन आहे. जयंती नाला पंपींग स्टेशन, सुतारवाडा, व्हीनस कॉर्नर परिसरातील नाल्यातील १२०० टन गाळ व १५ डंपर प्लास्टिक कचरा काढला आहे. कर्मचाऱ्यांद्वारे ४८ प्रभागातील २५७ तर पोकलॅनद्वारे ४ मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. जेसीबीद्वारे ९६ चॅनेल्सची सफाई झाली.
या सफाईतून ७९९ डंपरद्वारे अंदाजे ४२६२ टन गाळ काढण्यात आला आहे. तसेच ड्रेनेज लाईनच्या २२०० मॅनहोलपैकी ९४४ ची सफाई पूर्ण झाली आहे. सुतारवाड्यातील कामावर सहायक आयुक्त कृष्णा पाटील दररोज लक्ष ठेवून असून तेथील गाळ काढल्याने स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. परिसरात टाकलेले कचरा काढण्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.
दोन पोकलॅन, दोन जेसीबी, सहा हायवा डंपर असून, ४५ कर्मचाऱ्यांची दोन पथके आहेत. पोकलॅनद्वारे गाडी अड्डा ते लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ते महालक्ष्मीनगर, वर्षानगर ते मनोरा हॉटेल व वाय.पी. पोवार नगर ते हुतात्मा पार्क गार्डन येथील सफाई पूर्ण झाली आहे. वर्षानगर ते ॲस्टर आधार हॉस्पिटल, गाडी आड्डा ते सुतारवाडा, जयंती नाला याठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी या कामाचा आढावा घेतला. क्षेत्रीय अधिकारी व उपशहर अभियंत्यांना कामाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपायुक्त साधना पाटील, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, वित्त अधिकारी सुनील काटे उपस्थित होते. उर्वरीत सर्व नालेसफाईचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com