तोडणी - ओढणी वाहतूक यंत्रणेला ‘आजरा’कडून अॅडव्हान्स

तोडणी - ओढणी वाहतूक यंत्रणेला ‘आजरा’कडून अॅडव्हान्स

ajr302.jpg.....
80766
गवसे (ता. आजरा) : येथील आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर तोडणी-ओढणी वाहतूक यंत्रणेला अॅडव्हान्सचा धनादेश प्रदान करताना मुकुंदराव देसाई. यावेळी वसंतराव देसाई, दीपक देसाई, राजेश जोशिलकर, हरिभाऊ कांबळे, रशिद पठाण, मारुती घोरपडे, रणजित देसाई, अशोक तर्डेकर, आदी.
-------------------------
तोडणी-ओढणी वाहतूक यंत्रणेला ‘आजरा’कडून अॅडव्हान्स
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३० : गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याकडून बीड येथील तोडणी वाहतूक यंत्रणेशी करार केलेल्या वाहतूकदारांना अॅडव्हान्सचे वाटप केले. पुढील २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी ४ लाख टन ऊस गाळपाचे आजरा कारखान्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार कारखान्याने आवश्यक सक्षम तोडणी वाहतुकीचे करार करण्याचे काम सुरू केले आहे.
ज्या वाहतूकदारांची कराराच्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. त्यांना धोरणानुसार आज कारखाना संचालक व अधिकाऱ्यांच्या हस्ते अॅडव्हान्स पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान केले. कारखान्याने ठरवलेल्या उद्दिष्‍टाप्रमाणे ऊस उपलब्ध व्हावा यासाठी आजरा, गडहिंग्लज व चंदगड या भागातील उस नोंदीचे काम सुरू आहे. आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांतील स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करावयाचे असतील त्यांनी कारखाना कार्यस्थळ गवसे येथील कार्यालयाशी संपर्क साधून करार करावेत, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी केले आहे. संचालक मुकुंदराव देसाई, मारुती घोरपडे, दीपक देसाई, रणजित देसाई, राजेश जोशिलकर, अशोक तर्डेकर, हरिभाऊ कांबळे, रशिद पठाण, प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, भूषण देसाई, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com