लोकसभेत -दक्षिण मध्ये सर्वाधिक मतदान

लोकसभेत -दक्षिण मध्ये सर्वाधिक मतदान

वाढीव मतदानाचा टक्का ठरणार निर्णायक

६२ हजार मतदार वाढले ः सर्वाधिक मतदारसंख्या ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः कोल्‍हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक मतदार ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये आहेत. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये एकूण १८ लाख ७४ हजार ३४५ मतदार होते. पैकी १३ लाख २२ हजार १६१ मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांची संख्या १९ लाख ३६ हजार ४०३ आहे. प्रत्यक्षात ६२ हजार ५८ मतदार वाढले आहेत. पण मतदानाची आकडेवारी वाढल्यास तोच कौल निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा आणि मतदारांचा उत्साह यावर उमेदवारांच्या मताधिक्याचा आकडा ठरू शकतो.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर यांचा यामध्ये समावेश आहे. गतवेळीच्‍या २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सर्वच मतदारसंघांत मतदारांची संख्या वाढली आहे. गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता अधिक आहे. मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवला तर त्याच मतदारांचा कौल विजयी उमेदवाराचे मताधिक्य ठरविणार आहे. २०१९ मध्ये संजय मंडलिक हे दोन लाख ७० हजार ५६८ मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी त्यांना सर्वाधिक कागल विधानसभा मतदारसंघातून ७१ हजार ४२७ इतके मताधिक्य मिळाले आहे. त्या खालोखाल
चंदगडमध्ये ५० हजार १३१, कोल्हापूर दक्षिणमध्ये ४३ हजार ६१७, राधानगरी ३९ हजार २१५, करवीर ३६ हजार ८१० आणि सर्वात कमी २७ हजार ६५५ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मिळाले आहे. त्यावेळी खासदार मंडलिक यांच्याकडे आमदार सतेज पाटील यांची ताकद होती. या निवडणुकीत सर्वच गणिते बदलली आहेत.
२०१९ मध्ये झालेले मतदान आणि २०२४ मध्ये नोंदणी असलेल्या मतदारांची संख्या पाहता, यावेळी जादा मतदान होणे अपेक्षित आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ४९ हजार २०६ मतदारांची संख्या आहे. याच मतदारसंघातून गतवेळी संजय मंडलिक यांना ४३ हजारांचे लीड मिळाले होते. यावर्षी सर्वच विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या वाढली आहे. वाढीव मतदारांनी मतदान केले, तर नक्कीच हेच मतदार विजयी उमेदवाराचे मताधिक्य ठरवतील.
...
‘कोल्हापूर उत्तर’मध्ये कमी मतदार
मतदान कोणत्या विधानसभा मतदारसंघात अधिक होणार, त्यावर विजयी उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. साधारण ‘कोल्हापूर उत्तर’ मतदार संघ वगळल्यास इतर विधानसभा मतदारसंघात तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यामुळे विजयी उमेदवाराची मदार ही शहरात नसून, दक्षिण आणि इतर विधानसभा मतदारसंघांत दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com