टाटा तनिष्क ​तर्फे अक्षयतृत्तीया ​विशेष ऑफर

टाटा तनिष्क ​तर्फे अक्षयतृत्तीया ​विशेष ऑफर

टाटा तनिष्क​तर्फे
अक्षयतृतीया ​विशेष ऑफर

​कोल्हापूर, ता. ३० : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या अक्षयतृती​यानिमित्त तनिष्क​च्या दागिने खरेदीवर विशेष ऑफर देण्यात आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०​ ​टक्केपासून २०​ ​टक्केपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच हिरेजडीत दागिन्यांच्या खरेदीवर पाच​ ​टक्क्यापासून २०​ ​टक्क्यापर्यंत पूर्ण रकमेवर सूट मिळणार आहे. ही ऑफर ​२​ ते १२ मे पर्यंत चालू ​राहणार आहे.
​ टाटा तनिष्कच्या प्रत्येक दागिन्यासोबत शुध्दतेचे प्रमाणपत्र दिले जाते. विक्रीपश्चात देशभरात ४५० हून अधिक तनिष्क शोरूममध्ये मिळणारी​ सेवा या सर्व वैशिष्ट्यांमुळे टाटा तनिष्क भारतातील सर्वांच्या आवडीचा ज्वेलरी ब्रँड ​बनला आहे.​ सध्या टाटा तनिष्कमध्ये जुने सोने बदलून नवीन दागिना खरेदीचाही फायदा ​ग्राहकांना मिळणार आहे. या ऑफरमध्ये कॅरेटनुसार दर देऊन ग्राहक आपल्या पसंतीचा दागिना घेऊ शकतात. तनिष्कच्या दागिन्यांमध्ये वैविध्यपूर्ण नमुने व कलाकुसर पाहावयास मिळतात. विविध डिझाइन्सचे छोटे व मोठे असे एक​ हजारहून अधिक मंगळसूत्र सध्या तनिष्कमध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बँगल्सचे ५००​ हून अधिक नमुने पाहावयास मिळतात. तोड्यांचे विविध प्रकारही उपलब्ध आहेत. २४ कॅरेटमध्ये पाटली, बिलवर, पोहेहारही उपलब्ध आहेत. राणी​ हार, लक्ष्मी​ हार, पुतळी​ हार यांचे नमुने पाहावयास मिळतात. अंगठ्यांचे, कर्णफुलांचे, नेकलेस, नेकनेल सेट यांचे विविध कलाकुसरीचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या सुलभ खरेदीसाठी टाटा तनिष्कच्या भिशीमध्येही सहभागी होऊ शकता.​ तरी या अक्षयतृतीयाच्या मुहूर्ताच्या खरेदीचा आनंद ​घेण्यासाठी टाटा तनिष्क, दसरा चौक, कोल्हापूर व एस.एफ.सी- मेगा मॉल, सांगली येथे अवश्य भेट द्यावी, असे आवाहन प्रसाद कामत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com