आज पासून घरातून मतदान

आज पासून घरातून मतदान

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचे
आजपासून घरातून मतदान
विशेष व्यवस्था; शुक्रवारपर्यंत मोहिम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः जिल्ह्यातील ८५ पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना यंदापासून घरातून मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. यासाठी १२ डी अर्ज भरून घेण्यात आले आहेत. या मतदान प्रक्रियेला उद्या (ता.१) पासून प्रारंभ होणार आहे. शुक्रवार (ता. ३) पर्यंत मतदान स्वीकारले जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे चार हजार २५ जण या सुविधेचा लाभ घेऊन घरातून मतदान करणार आहेत.
मतदान करणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना शारीरिक मर्यादांमुळे मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये म्हणून यंदापासून निवडणूक आयोगाने ८५ पेक्षा जास्त वय आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा दिली आहे. या अंतर्गत निश्चित केलेल्या निकषातील व्यक्तींच्या घरामध्ये जाऊन त्यांच्याकडून १२ डी फॉर्म भरून घेतले आहेत. त्यामुळे त्यांची आकडेवारी निश्चित झाली.

अशी आहे प्रक्रिया ...
निवडणूक आयोगाचे पथक संबंधित प्रत्येक घरामध्ये जाणार आहे. घरामध्ये स्वतंत्र बूथ उभारणार असून तेथे मतदान यंत्रावर मतदान घेणार आहे. या पथकामध्ये दोन पोलिस कर्मचारी, व्हिडिओग्राफर, विभागीय अधिकारी, दोन मतदान अधिकारी असणार आहेत.
...
दोन वेळा संधी
मतदान करून घेणारे पथक घरी गेल्यावर संबंधित व्यक्ती मतदान करण्याच्या स्थितीमध्ये नसेल किंवा बाहेर गेली असेल, तर त्यावेळी मतदान होत नाही. अशा वेळी त्यांना पुढची वेळ दिली जाते. त्यावेळी पुन्हा हे पथक त्यांच्या घरी जाऊन मतदान घेते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com