ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क...

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क...

फोटो 80935, 80936

३३०१ जणांनी घरातून बजावला हक्क
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाच्या मतदानाचे दोन दिवसांतील चित्र, आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरातून मतदान करण्याच्या प्रक्रियेला बुधवार (ता. १) पासून सुरुवात झाली. गुरुवार (ता. २) पर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून २३४४ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ९५७ अशा तब्बल ३३०१ मतदारांनी घरातूनच मतदानाचा हक्क बजावला. उद्या, शुक्रवार (ता. ३) हा मतदानाचा अखेरचा दिवस आहे.
मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगानने ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असणाऱ्यांना घरातून मतदान करण्याची सुविधा दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण २९०४ मतदार असून, यामध्ये २३९४ ज्येष्ठ नागरिक व ५०९ दिव्यांग मतदार आहेत. तर हातकणंगले मतदारसंघात एकूण १०२७ मतदार असून, यामध्ये ८६४ ज्येष्ठ नागरिक व १६३ दिव्यांग मतदार आहेत. बुधवारी (ता. १) सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दोन्ही मतदारसंघांतील विधानसभानिहाय सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली.
दरम्यान दिवसभरात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मतदान केलेल्यांमध्‍ये १९४१ ज्येष्ठ नागरिक व ४०३ दिव्यांगांचा समावेश होता. तर हातकणंगले मतदारसंघातून ७९९ ज्येष्ठ नागरिक व १५८ दिव्यांगांचा समावेश होता.

कोट
80931
निवडणूक आयोगाकजून चांगली सुविधा
लोकसभा निवडणुकीत मतदार वंचित राहू नयेत, यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट घरातून मतदान ही संकल्पना चांगली आहे. मतदान घेण्यासाठी येण्यापूर्वी कल्पना दिली होती. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित माहिती दिली. त्यानंतर मतदान केले.
-उषा हेर्लेकर (वय ८५), वरुणतीर्थ वेस, कोल्हापूर
..................................................................
80933
मतदान प्रक्रिया अतिशय चांगली
या निवडणुकीत थेट घरातून ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी राबविलेली मतदान प्रक्रिया अतिशय चांगली आहे. वाढलेले वय व बाहेर तापणारे ऊन यामुळे इच्छा असूनही मतदानाला जाणे अशक्य होते; परंतु या सुविधेमुळे घरबसल्या मतदान करणे शक्य झाले.
-वासुदेव राशिवडेकर (वय ८८), सरनाईकवाडा, कोल्हापूर
.......................................................................
80932
घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला
सध्या ऊन भयंकर असून, या सुविधेमुळे मतदानासाठी उन्हात जायचा त्रास वाचला. मतदान करून घेण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रक्रियेबाबत चांगली माहिती मिळाली. या सुविधेमुळे घरबसल्या मतदानाचा हक्क बजावू शकलो.
-पुरुषोत्तम हेब्बाळकर (वय ८९), सरनाईक बोळ, कोल्हापूर.
-------------------------------------------------------------
80934
आतापर्यंत न चुकता मतदान केले
स्वतंत्र भारताच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे. निवडणूक विभागाने ज्येष्ठ मतदारांसाठी त्यांच्या घरात जाऊन मतदान घेण्याच्या दिलेल्या सुविधेमुळे यावेळीही मतदानाचा हक्क बजावला.
-प्रभा देशपांडे (वय ९५), प्रतिभानगर, कोल्हापूर
.............................................................
८११७७
माझा मुलगा कैफ बारगीरने घरातून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याचा अभिमान आहे. संविधानाने मिळालेल्या अधिकाराचा उपयोग झाला. घरी आल्यानंतर त्यांनी दिव्यांगत्वाच्या प्रमाणाविषयी खातरजमा केली. निवडणूक आयोगाने केलेले नियोजन चांगले होते.
-तारिक बारगीर (कैफ बारगीरचे वडील), कारंडे मळा, कोल्हापूर
........................................................................................
चार्ट करावा
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे मतदान असे
विधानसभा मतदारसंघ एकूण मतदान झालेले मतदान
चंदगड ७०० ६५१
राधानगरी ४५९ १८१
कागल ५१० ४७९
कोल्हापूर (दक्षिण) ४५७ ४५२
करवीर ३७९ २३४
कोल्हापूर (उत्तर) ३९९ ३४७
शाहुवाडी १६५ १६३
हातकणंगले १५७ १४७
इचलकरंजी १४९ १४१
शिरोळ १२५ १३१
इस्लामपूर १२३ ११६
शिराळा २८१ २५९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com