विद्यापीठात ११ मे रोजी  मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम

विद्यापीठात ११ मे रोजी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम

विद्यापीठात ११ मे रोजी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागातर्फे ‘फ्युचर ऑफ वर्क, वर्कप्लेस अँड ह्यूमन रिसोर्स’ या विषयावर ११ मे रोजी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम होणार आहे.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात विधिज्ञ आदित्य जोशी, अभय नेवगी, दीपक जोशी, कल्याणी ग्रुपचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख अरुण फुलेरा, के. एस. बी. इंडियाचे उपाध्यक्ष- मानव संसाधन व्यवस्थापक मोहन पाटील, भारत फोर्जचे संचालक मानव संसाधन व्यवस्थापक डॉ. संतोष भावे, विलो माथेर आणि प्लॅट पंप्सचे मानव संसाधन व्यवस्थापक नितीन असलकर, भारत फोर्जचे मानव संसाधन व्यवसाय भागीदार श्रेयश किरपेकर, विद्यापीठातील वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन, टेक महिंद्रा हायरिंग अँड ट्रेनिंगचे प्रमुख उमेश गंजले, रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. मनीषा संक्षेना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रोग्राममधील सहभागासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ६ मेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन संयोजक डॉ. अमोल मिणचेकर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट प्र-संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com