मोटारसायकल रॅलीने शिवजयंती उत्सवास सुरूवात

मोटारसायकल रॅलीने शिवजयंती उत्सवास सुरूवात

81166
कोल्हापूर : संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवास आज मोटारसायकल रॅलीने सुरुवात झाली.

मोटारसायकल रॅलीने
शिवजयंती उत्सव सुरू
सळसळता उत्साह; शिवरायांचा अखंड जयघोष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः युवकांचा सळसळता उत्साह ‘जय भवानी, जय शिवाजी’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा अखंड जयघोषात आज निघालेल्या मोटारसायकल रॅलीने संयुक्त मंगळवार पेठेच्या शिवजयंती उत्सवास सुरुवात झाली. हातात भगवे ध्वज फिरवत आणि ‘आम्ही मंगळवार पेठेचे मंगळवार पेठ आमची’ असे फलक घेतलेले शेकडो युवक या रॅलीत सहभागी झाले.
संयुक्त मंगळवार पेठ व राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवास सुरुवात झाली. हुतात्मा स्मारकास अभिवादन करून मिरजकर तिकटी, शाहू बँक, नंगिवली चौक, लाड चौक, न्यू महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप, सबजेल रोड, बिंदू चौक, आझाद चौक, सुभाष रोड, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडीयम, संभाजीनगरमार्गे मिरजकर तिकटी येथे रॅली विसर्जित करण्यात आली. ही रॅली उत्सव समितीचे आर्यन जाधव, यश कदम, विनायक पाटोळे, अक्षय देवकर, ओमकार घोटणे, श्रीधर पाटील, प्रथमेश मोहिते, केशव बेंडके, अनिकेत घोटणे, सदानंद सुर्वे, सतीश जोशी, अभिजित पवार, राहुल चव्हाण, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत भोसले, संदीप चौगुले आदी कार्यकर्त्यांनी यशस्वी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com