माने अंक

माने अंक

फोटो- 81176

..तर निवडणूक लढवणार नाही
धैर्यशील माने : इचलकरंजीच्या पाणीप्रश्‍नी दिले वचन

इचलकरंजी, ता. २ : इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्‍याच्‍या प्रश्नावर काही मंडळी राजकारण करीत आहेत. मात्र, सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच मला जनतेने निवडून दिले आहे. इचलकरंजीच्या नागरिकांसाठी पिण्याची पाणी योजना आणण्याचे काम माझे आहे. भविष्यकाळात इचलकरंजीला पिण्याचे पाणी मी आणले नाही, तर कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असा निर्धार खासदार धैर्यशील माने यांनी जाहीर केला.
येथील थोरात चौकातील प्रचार सभेत ते बोलत होते. माने म्हणाले, ‘इचलकरंजीच्या पंचगंगा नदीचा पाणी प्रदूषण प्रश्र महत्त्‍वाचा असून, सीईटीपी प्रकल्पासाठी ५३२ कोटी रुपये मंजूर केले. लवकरच ते काम पूर्ण होऊन पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होईल. तसेच इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याची सुळकूड पाणी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मी स्वतः मंजूर करून आणली आहे. त्यासाठी १६१ कोटी निधी मंजूर केला आहे. दोन वेळा टेंडरही प्रसिद्ध झाले आहे. लवकरच पाणी योजनेचे काम सुरू होईल.’
प्रचारसभेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धैर्यशील माने यांनी श्री. स्वामी समर्थांची मूर्ती भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com