‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार स्वप्निल आवाडे यांना

‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार स्वप्निल आवाडे यांना

ich92.jpg
82683
इचलकरंजी ः स्वप्नील आवाडे यांना ‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले.
---------
‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’
पुरस्कार स्वप्नील आवाडे यांना
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० ः येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांना ‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ दि इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. क्रेस्ट इन्फो मीडिया (उत्तर प्रदेश) या संस्थेकडून पुणे येथे आयोजित ऑल इंडिया अर्बन को-ऑप बँकिंग अ‍ॅवॉर्डस् सोहळ्यात हा पुरस्कार दिला.
नवी दिल्लीच्या नॅशनल अर्बन को-ऑप. फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन संस्थेचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता यांच्याहस्ते आणि संयोजक संस्थेचे प्रमुख गौतम नवीन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला. दरम्यान, बँकेमध्ये अत्याधुनिक डिजिटल सुविधेचा वापर करून, ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहिल्याबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेस ‘बेस्ट डिजिटल बँक ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरवले.
जनतेला विनासायास अर्थसहाय्य व सौहार्दपूर्ण सेवा मिळावी, या उद्देशाने बँकेने अद्ययावत डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. याचेच फलित म्हणून मला व बँकेला प्रतिथयश पुरस्काराने गौरवल्याचे अध्यक्ष आवाडे यांनी सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष सीए संजयकुमार अनिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, संचालक बाबूराव पाटील, बंडोपंत लाड, बाळकृष्ण पोवळे, तात्यासाहेब अथणे, महेश सातपुते, श्रीशैल कित्तुरे, अविनाश कांबळे, सहायक व्यवस्थापक संतोष तेरदाळे, फिरोज मैंदर्गी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com