महावितरणकडून ग्राहकांसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉटची सुविधा

महावितरणकडून ग्राहकांसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉटची सुविधा

महावितरणकडून ग्राहकांसाठी
‘ऊर्जा’ चॅट बॉटची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : महावितरणने वीज ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ या महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर दिले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येणार आहेत. तसेच नवीन वीज जोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सुविधा आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅट बॉट www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. नवीन वीज जोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा, मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी, इतर विविध शुल्कांचा ऑनलाईन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीज वापर व बिलाचे कॅलक्युलेटर आदींबाबत वीज ग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅट बॉटद्वारे थेट मदत केली जात आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीज ग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४x७ हे सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, ‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवा आदींची माहिती चॅट बॉटद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com