शिवकालीन युद्धकला जपायची कशी...

शिवकालीन युद्धकला जपायची कशी...

शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे संग्रहित छायाचित्र वापरावे....
............

शिवकालीन युद्धकला जपायची कशी?

खेळाडूंसमोर प्रश्न ः प्रात्यक्षिकांसाठीच्या साहित्याचे दर अव्वाच्या सव्वा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : वेताची काठी, चामडी फरी व पट्ट्याच्या खोगळ्याचे वाढते दर पाहता शिवकालीन युद्धकला जपायची कशी, असा प्रश्‍न खेळाडूंसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कलेचा प्रचार वेगाने होत असताना बाराबंदी पोशाखाचा दरही अव्वाच्या सव्वा झाला आहे. ज्या आखाड्यांत जुनी शस्त्रे आहेत, त्यांच्याकडून शस्त्रे घेऊन प्रात्यक्षिके करण्याची वेळ आखाड्यांवर आली आहे.
शहर परिसरात आखाड्यांची संख्या पन्नासहून अधिक झाला आहे. महाकाली, नंगीवली, खंडोबा, मैदानी व मर्दानी खेळाचा, सुबराव गवळी, सणगर-बोडके, वेताळसह जय जवान फेकणे मंडळाने युद्धकलेची परंपरा जोपासली आहे. त्या त्या आखाड्यांत शस्त्रसाठ्याचे प्रमाणही अधिक होते. यात पट्टा, विटा, भाला, बाणा, तलवार, कुऱ्हाड, जंबिया, ढालीसह गदके व काठ्यांचा समावेश होता. या शस्त्रांचे प्रशिक्षण देऊन नवी पिढी घडविण्याचे काम वस्तादांनी केले. प्रत्येक आखाड्यात स्पर्धेच्या निमित्ताने चुरस होती. या कलेला उतरती कळा लागल्यानंतर आखाड्यांतून अनेक शस्त्रे चोरीला गेली. जी शिल्लक राहिली, त्याआधारे प्रशिक्षणाचे काम सुरू आहे.
गेल्या काही वर्षांत युद्धकलेला गती मिळाली आहे. शहरासह ग्रामीण भागात युद्धकलेने जोर धरला आहे. वेताच्या काठ्या घेऊन पूर्वी सराव चालायचा. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंतच्या उंचीची काठी दहा रुपयांना मिळत होती. त्याच काठीची किंमत आता २०० रुपयांवर पोहोचली आहे. पायाचा तळवा ते कमरेपर्यंतच्या गदक्याची किंमत दीडशे रुपये सांगितली जात आहे. पट्ट्याच्या खोगळ्याचा दरही ६०० रुपये आहे. फरी तयार करण्याचे काम करणारी मंडळी कमी झाली आहेत. त्यातही चामड्याचे दर वाढल्याने एक फरी तयार करण्यासाठी दोन हजार रुपये खर्च सांगितला जातो.
युद्धकला प्रात्यक्षिके मुले बाराबंदी पोशाखात, तर मुलींमध्ये भगव्या साड्या परिधान करून सादर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. बाराबंदी पोशाख शिवणारे टेलर कमी असल्याने त्यांच्याकडून मनमानी दर सांगितले जात आहेत.
..........
कोट...
जुनी शस्त्रे घेऊन प्रात्यक्षिके सादर करावी लागत आहेत. वेताची काठी खेळताना मोडली, तर ती खरेदी करताना पुन्हा २०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे प्रात्यक्षिकांना कोठे जायचे असेल तर अन्य आखाड्यांतील शस्त्रे घेऊन जावे लागत आहे
- राजेंद्र काटकर, शिवकालीन युद्धकला खेळाडू
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com