आजरा ः २० हजार ८१० हेक्टरवर खरीपाची पेरणी

आजरा ः २० हजार ८१० हेक्टरवर खरीपाची पेरणी

भात, भुईमूग क्षेत्र ६०० हेक्टरने घटणार
आजरा तालुका ः २०, ८१० हेक्टरवर खरीप पेरणी, ऊसपीक क्षेत्रात वाढ

रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा

आजरा, ता. ११ ः आजरा तालुक्यात यंदाचा खरीप यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन सुरू झाले आहे. तालुक्यात २० हजार ८१० हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. आंबेआेहळ, उचंगी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. ऊस पिकाखालील क्षेत्रात यंदा सुमारे १ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील भात व भुईमुगाचे क्षेत्र प्रत्येकी ३०० हेक्टरने घटणार आहे.
एप्रिल व मे महिन्यात लग्नसराई, यात्रा, जत्राचा हंगाम तालुक्यात जोरात सुरू आहे. शेतकरी यात गुंतल्याने शेती मशागतीच्या कामांना वेग आलेला नाही. पुढील आठवड्यापासून शेती मशागतींच्या कामांना वेग येणार आहे. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासनाचा कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पिकनिहाय आराखडा तयार करण्यात येत आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण तालुक्यात सरासरी पेक्षा निम्मे राहिले. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. या बाबींचा विचार करून आराखडा तयार केला जाणार आहे. खरीपाच्या आराखड्याबाबत काही दिवसांपूर्वी शासनाचा कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकाऱ्यांच्यात बैठक झाली. तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे व सहाय्यक गटविकास अधिकारी तथा पंचायत समिती कृषीचे प्रमुख अधिकारी दिनेश शेटे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी खरीप हंगामपूर्व गाववार शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहे. खरिपाची पेरणी, बियाणे, खते याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.
दोन वर्षांपासून आंबेआेहळ व उचंगी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा होत असल्याने आहे. जिरायत जमिनी ऊस लागवडीखाली आल्या आहेत. शेतकऱ्यांचा कल ऊस या नगदी पिकाकडे असल्याने यंदा ऊसाचे क्षेत्र १ हजार हेक्टरने वाढल्याने भात, भुईमूग पिकांचे क्षेत्रामध्ये ६०० हेक्टरने घट होणार आहे.

चाैकट
दृष्टिक्षेप
खरीप हंगामात पीकनिहाय होणारी लागवड (हेक्टरमध्ये)
भात -९०००, नागली -३३००, खरीप ज्वारी- १५, बाजरी, मका, इतर तृणधान्य वरी -०( एकूण तृण धान्य - १२ हजार ३१५). तूर, मुग, उडीद, इतर कडधान्य चवळी, श्रावण घेवडा, पावटा, कुळथी यासह इतर कडधान्य ५ (एकूण कडधान्य -५). भुईमृग-१३६५, तीळ, कारळा, सार्यफुल, सोयाबीन -५३०, इतर तेलबिया ०, (एकूण तेलबिया- १८९५), ऊस -६६००, मिरची- १४५, भाजीपाला-७ , चारापिक- ३४१ (एकूण -७९३)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com