आजरा ः गव्याच्या उपद्रवाने हैराण

आजरा ः गव्याच्या उपद्रवाने हैराण

गव्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
आजऱ्याच्या पूर्व भागात धुडगूस, बंदोबस्ताची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ ः गव्यांच्या कळपाने आजरा तालुक्यातील पूर्वभागातील शेतकरी हैराण झाला आहे. हाजगोळी, भादवण परिसरात गव्यांनी पिकामध्ये धुडगूस घातला आहे. उसाची लावण, खोडवे यांचे ते मोठे नुकसान करीत आहेत. गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
भादवण व हाजगोळी परिसरातील दहा - पंधरा गावांत गव्यांचा कळप धुडगूस घालत आहे. मलिग्रेचा जंगल परिसर, चाफ्याची भाव परिसरात तळ ठोकून असलेले गव्यांचे कळप सायंकाळी, रात्री व पहाटेच्या वेळात शेतात उतरून नुकसान करत आहेत. उसाची तरारलेली लुसलुशीत पाती खाण्यावर त्यांचा अधिक जोर आहे. मागील दोन महिन्यांत तर गव्यांच्या कळपाने या परिसरात अनेकदा पिके फस्त केली आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करून पाहिल्या; पण गवे त्यांना दाद देईनासे झाले आहेत. या गव्यांना रोखायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजनांचा अवलंब करावा व गव्यांपासून शेतीचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दोन दिवसांपासून गव्यांचा कळप ‘परळ’ नावाच्या शेतात उतरत आहे. येथील शेतकरी एकनाथ येसादे, नामदेव निकम, पांडुरंग मांगले, संजय देसाई, अरुण देशपांडे, मारुती पाटील यांचे पाच एकर क्षेत्रांतील ऊस पीक गव्यांनी फस्त केले आहे.
...

‘हाजगोळी बुद्रुक परिसरात गव्यांच्या कळपाने तळच ठोकला आहे. त्यांनी केलेल्या ऊस पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. वन विभाागाने गव्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
- एकनाथ येसादे, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com