लक्ष्मीसेन जैन मठात मंगलमय वातावरणात महामस्तकाभिषेक

लक्ष्मीसेन जैन मठात मंगलमय वातावरणात महामस्तकाभिषेक

82880
...
मंगलमय वातावरणात महामस्तकाभिषेक
लक्ष्मीसेन जैन मठ : तीन हजारांहून अधिक जैन बांधव-भगिनी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : भगवान १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक सोहळा आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवार पेठेतील महास्वामी लक्ष्मीसेन मठात मंगलमय व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी परमपूज्य स्वामीजी लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य, ज्योतिषाचार्य प्रणामसागरजी महाराज, चर्याशिरोमणी अध्यात्म योगी १०८ श्री विशुद्धसागरजी महाराज आणि २० महामुनींचे पावन सान्निध्य लाभले. यंदा केसापूर जैन मंदिराकडील महामस्तकाभिषेक समितीकडे पूजेचे नियोजन देण्यात आले होते.
मांगलिक कार्यक्रमांना सकाळपासून सुरुवात झाली. त्यात सकाळी सहा वाजता मंगल वाद्य घोष, ध्वजारोहण, सकाळी ८.३० वाजता भगवान चंद्रप्रभ तीर्थकर अभिषेक, श्री ज्वालामालिनी देवी अभिषेक व षोड्‍शोपचार पूजा झाली. दुपारी दोन वाजता आचार्यश्रींचे प्रवचन, तर चार वाजता भगवान आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेकास सुरुवात झाली. पंचामृत, प्रथम कलश, नारळपाणी, इक्षुरस, आमरस, दुग्धाभिषेक, सर्वौषधी, कल्कचूर्ण, श्‍वेतचंदन, रक्तचंदन, हळद, कुंकू, अष्टगंध, पूर्ण सुगंधित कलाभिषेक असा परंपरेनुसार अभिषेक करण्यात आला. यासह शांतिधारा, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य असे चतुष कोन कलशाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंगल आरती, पुष्पवृष्टी आणि रत्नवृष्टीने या मंगलमय व धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी सुरेश मगदूम, भरतेश सांगरूळकर, धनंजय मगदूम, नेमिनाथ कापसे, संजय आडके, संजय कापसे, संजय कोठावळे, अशोक रोटे, अनघा सांगरूळकर, ज्योती शेट्टी, रूपाली पत्रावळे, पद्मा घोडके, सन्मती हंजे, राजेश उपाध्ये यांच्यासह महामस्तकाभिषेक सोहळा समितीच्‍या पदाधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक जैन बांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com