पॅचवर्कसाठी तयारीच्या सूचना

पॅचवर्कसाठी तयारीच्या सूचना

82851
वर्दळीच्या रस्त्यावरील पॅचवर्कच्या
कामांचे नियोजन करण्याच्या सूचना

कोल्हापूर, ता. १० ः शहरातील चारही विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील वर्दळीच्या रस्त्यावरील पॅचवर्कच्या कामांचे नियोजन करण्याच्या सूचना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आज दिल्या.
चारही विभागीय कार्यालयांच्या उपशहर अभियंत्यांची सरनोबत यांनी आज बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी प्रत्येक भागातील वर्दळीच्या तसेच खराब होत असलेल्या रस्त्यांची माहिती घेतली. आपापल्या विभागाने पॅचवर्कसाठी डांबराची ऑर्डर देऊन कामाला सुरुवात करावी, अशा सूचनाही केल्या. त्याबाबत उद्या पुन्हा साऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी डांबरी प्रकल्पाच्या कामाचाही आढावा घेतला. चारही विभागीय कार्यालयांचे उपशहर अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com