कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

82870
......
जिल्हा केमिस्ट असोसिएशनची
पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

३९ जणांचे संचालक मंडळ; अध्यक्ष, उपाध्यक्षांची मंगळवारी होणार निवड

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : येथील कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक (सन २०२४-२०२९) बिनविरोध झाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जेवढ्या जागा आहेत तेवढेच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ३९ जणांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. रवी शिराळकर यांनी जाहीर केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजानिस या पदाधिकाऱ्यांची निवड मंगळवारी (ता. १४) होणार आहे.
पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदन पाटील, संजय शेटे, शशिकांत खोत, शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, महेश सावंत, सुरेश काटकर यांनी प्रयत्न केले. निवड झालेल्या संचालक मंडळामध्ये शिवाजी यादव, अशोक पाटील, विकास पाटील (करवीर तालुका), मदन पाटील, संजय शेटे, महेश सावंत, सुरेश काटकर, दाजीबा पाटील, आदित्य चौगुले, विजय देवणे, कैवल्य कुलकर्णी, दीपक वाडकर (कोल्हापूर शहर), अशोक बोरगांवे, प्रल्हाद खवरे, भुजिंगराव भांडवले, सचिन पाटील, संतोष पाटील, सुनील पाटील, संजय हारगे (हातकणंगले तालुका), शिवाजी ढेंगे, गजानन मिटके (भुदरगड), किरण दळवी, आप्पासाहेब काडगे, अमरसिंह शिंदे (शिरोळ), संदीप मिसाळ, आनंदा क्षीरसागर (गडहिंग्लज), मोहन ढेरे, नंदकुमार पाटील (कागल), संभाजी कलिकते, सागर ढेरे (राधानगरी), किरण जाधव, अशोक पाटील (पन्हाळा), भरतेश कळंत्रे (शाहूवाडी), अनिल होनगेकर ( चंदगड), संजय हरेर (आजरा), सुधीर डकरे (गगनबावडा), विद्याराणी चौगले, अश्विनी खाडे, अनुजा पाटील (महिला संचालक) यांचा समावेश आहे.
....
संचालक मंडळात नव्या २५ चेहऱ्यांना संधी
‘यंदा असोसिएशनची निवडणूक बिनविरोध करण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला. त्याला सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बिनविरोधची परंपरा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद होत आहे. यावेळी संचालक मंडळामध्ये नव्या २५ चेहऱ्यांना संधी दिली आहे. मंगळवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष, आदी पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याचे मदन पाटील आणि संजय शेटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com