गॅसलाईन खोदाई थांबवा

गॅसलाईन खोदाई थांबवा

तपोवन प्रभागात गॅस पाईपलाईन
खोदाई थांबविण्याची मागणी

कोल्हापूर, ता. १० ः तपोवन प्रभागात गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे किंवा डांबरीकरणापर्यंत खोदाई बंद करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांनी प्रशासकांकडे केली.
खाडे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या प्रभागात दोन महिन्यांपासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे अंतर्गत रस्ते दुतर्फा खोदल्याने दुरवस्था झाली आहे. जिथे खोदाई करून पाईप टाकली आहे, ती व्यवस्थित मुजवली नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. किरकोळ अपघातही होत आहेत. खोदाईच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. १५ मेनंतर डांबरीकरण बंद केले जाते. सुरू होणाऱ्या पावसामुळे हे रस्ते आणखी खराब होणार आहेत. त्यासाठी लवकरात लवकर डांबरीकरण करावे. पुढील खोदाई डांबरीकरण सुरू होईपर्यंत बंद ठेवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com