पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

महिलेला मारहाणप्रकरणी
तिघांवर गुन्हा
कोल्हापूर : शिवागीळ केल्याच्या गैरसमजातून विचारेमाळ येथे चाकू, कोयत्याचा धाक दाखवून धमकी दिल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अजित भोसले, शिल्पा भोसले व त्यांचा भाचा अथर्व अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राधाबाई दिनकर कांबळे (वय ४० रा. विचारेमाळ) यांनी शाहुपूरी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
...
सीबीएसवरून प्रवाशाचा मोबाईल चोरीस
कोल्हापूर : पत्ता विचारण्याचा बहाणा करून चार अनोळखी तरुणांनी प्रवाशाच्या खिशातील मोबाईल चोरला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडलेल्या प्रकाराची तक्रार मारुती फड (वय ३३, रा. सेनी, लातूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. २० ते २२ वयोगटांतील चौघांचे हे कृत्य असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
...
जनरेटरची बॅटरी चोरीस
कोल्हापूर : रुईकर कॉलनी परिसरातील मोबाईल कंपनीच्या टॉवरच्या जनरेटरची बॅटरी आणि ३० लिटर डिझेलचा कॅन चोरट्याने पळविला. याबाबत दिनेश जाधव (रा. कदमवाडी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
...
यात्रेत तरुणास मारहाण
कोल्हापूर : निवडे (ता. पन्हाळा) येथे यात्रेदरम्यान झालेल्या हाणामारीत आदित्य यशवंत पाटील (वय २०) जखमी झाला. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गावातील हनुमान मंदिराजवळ हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
...
विष पिल्याने एकाचा मृत्यू
कोल्हापूर : विषारी द्रव्‍य प्याल्याने प्रकृती चिंताजनक बनलेले महेश परशुराम मडिवाल (वय ५२, रा. वळीवडे, करवीर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार मे रोजी राहत्या घरी विषारी द्रव पिल्याने उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com