परशुराम पालखी मिरवणूक उत्साहात

परशुराम पालखी मिरवणूक उत्साहात

फोटो 82878
---
लोगो परशुराम जयंती

चित्ररथ, वाद्यवृंदांचा गजर
अन् वारकरी पथक...

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः चित्ररथ....वाद्यवृंदांचा गजर...वारकरी पथक...पारंपरिक वेशभूषेतील बंधू-भगिनी आणि परशूरामांच्या जयघोषात परशुराम पालखी सोहळा उत्साहात झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पेटाळा येथून पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याहस्ते पालखीचे पूजन करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. तीन हजारावर ब्राह्मण बांधवांचा सहभाग होता.
ब्राह्मण समाज आणि विविध संस्थांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी मिरणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपरिक वेशभूषेतील बंधूभगिनी भगव्या टोप्या, वस्त्र परिधान करुन सहभागी झाले होते. तरुणांची बाईक रॅली, पांरपरिक वाद्यांचे पथक, चित्ररथ, लेझीम पथक, वारकरी मंडळाचे पथक अग्रभागी होते. श्रींच्या पालखीपुढे मंत्रोपचार करणारे पुरोहीत पायी सहभागी झाले होते. पालखी मिरवणूक खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदीर, ताराबाई रोड, निवृत्ती चौक मार्गे पुन्हा पेटाळा मैदान येथे पोहोचली. यावेळी भगवान परशुरामांचा जयघोष करण्यात आला सायंकाळी ६. ५५ वाजता मुहूर्तावर श्रींचा पाळणा सोहळा, सुंठवडा वाटप करण्यात आले. संपूर्ण पौरोहीत्य प्रसाद निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, समस्त ब्राह्मण समाजातर्फे कात्यायनी येथील श्री परशुराम मंदिरात सकाळी पूजन करण्यात आले. तसेच कोल्हापूर चित्पावन संघामध्येही श्री परशुराम मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com