प्राणी गणनेसाठी बुधवारपर्यंत अर्ज करावेत : एस. एस. पवार

प्राणी गणनेसाठी बुधवारपर्यंत अर्ज करावेत : एस. एस. पवार

शिकारीला आळा घालण्यासाठी सायबर सेल

राधानगरी, सागरेश्‍वर अभयारण्यांत होणार प्राणी गणना
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः''अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आता आळा बसणार आहे. यासाठी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूरअंतर्गत कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीप्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सायबर सेल स्थापन करण्यात आली आहे’, अशी माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस. एस. पवार यांनी दिली.
वन्यजीव व वनगुन्हे यांना आळा घालण्यासाठी संशयित आरोपी यांच्यावरील आरोप सिध्द होण्यासाठी सी.डी.आर.,एस.डी.आर., एल.टी.एल., टी.डी.डी.,या कार्यालयाकडे अधिकृतपणे मागविण्यात आलेली माहिती गोपनीय पध्दतीने संबंधित मागणी करणाऱ्या विभागाला पुरविण्यात येणार आहे. त्याचा फायदा अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी वन विभागाकडील क्षेत्रीय कर्मचारी-अधिकारी यांना होणार आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोल्हापूर वन्यजीव विभागाअंतर्गत २२ व २३ मे रोजी बुध्द पौर्णिमेदिवशी प्राणिगणना करण्यात येणार आहे. ही प्राणिगणना राधानगरी अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्य येथील जंगलातील विविध ठिकाणी होणार आहे. प्राणी गणनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्राणी गणनेकरिता उपलब्ध अर्ज डाऊनलोड करून भरून या कार्यालयाच्या census2023wlkop@gmail.com या इ-मेलवर ता. १० ते १५ मे (बुधवार) पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह पीडीएफ स्वरुपात पाठवावा. या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरुपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच मचाण मर्यादित असल्याने प्रथम ई-मेल येणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे एस. एस. पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
...

बुध्द पौर्णिमेदिवशी प्राणिगणना
कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमेदिवशी रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर जिल्हा) व सागरेश्वर अभयारण्य (सांगली जिल्हा) मध्ये प्राणिगणनेचा कार्यक्रम केला जातो. या प्राणिगणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. दरवर्षी प्राणिगणनेस उदंड प्रतिसाद मिळत असतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते. त्यांच्यासाठी या एक दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो. अर्ज भरण्याबाबत शंका असल्यास विचारेमाळ येथील विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com