कर्णकर्कश साऊंड सिस्टिमप्रकरणी गुन्हे दाखल करणार ः उपअधीक्षक टिके

कर्णकर्कश साऊंड सिस्टिमप्रकरणी गुन्हे दाखल करणार ः उपअधीक्षक टिके

कर्णकर्कश साऊंड सिस्टिमप्रकरणी
गुन्हे दाखल करणार ः उपअधीक्षक टिके
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः पारंपरिक शिवजयंती मिरवणुकीवेळी काही मंडळांनी कर्णकर्कश साऊंड सिस्टिम लावली होती. मिरवणुकीत सहभागी सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त होताच गुन्हे दाखल करणार असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी शहरासह उपनगरांतील २० ते २२ मंडळांच्यावतीने शिवजयंती मिरवणुका काढण्यात आल्या. अपवाद वगळता सर्वच मंडळांनी अवाढव्य सेट उभे करून साऊंड सिस्टीम, डोळ्यांना घातक अशी विद्युत रोषणाई लावली होती. पोलिसांनी या मंडळांना लावलेल्या साऊंडचा डेसिबल मोजून तो तपासणीसाठी पाठवला. याचा अहवाल येत्या दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. अहवाल येताच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. रात्री बारा वाजता अनेक मंडळे महाद्वार रोडवरच होती. मात्र, पोलिसांनी वेळेची मर्यादा पाळून सर्व साऊंड सिस्टीम बंद केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com