‘डीकेटीई’मध्ये स्मार्ट इरिगेशन सिस्टीम प्रकल्प विकसित

‘डीकेटीई’मध्ये स्मार्ट इरिगेशन सिस्टीम प्रकल्प विकसित

82904
इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी शेतीसाठी तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.

स्मार्ट इरिगेशन सिस्टीम
‘डीकेटीई’मध्ये विकसित
पाण्याचा अपव्यय थांबणार; इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांचे यश
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ११ : येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थी प्रतीक पाटील, साक्षी उगारे, मसीरा शिलेदार, शुभम बावले यांनी शेतकऱ्यांसाठी स्मार्ट इरिगेशन सिस्टीम युजिंग अर्टिफिएशल इंटेलिजएन्स हा नावीन्यपूर्ण प्रकल्प विकसित केला आहे. प्रा. शुभांगी मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला. हा प्रकल्प शेतकऱ्यांना दिलासा देणारा असून, यामध्ये पिकाला पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुध्दिमतेचा (एआय) वापर केला आहे. यामध्ये मातीतील आर्द्रता निरीक्षण करणे आणि सिंचन नेटवर्कमध्ये स्वंयचलित पध्दतीने गरज असेल तेव्हा पाणी सोडणे हे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना अनेकवेळा पाण्याअभावी शेती करता येत नाही, तर शेतातील पाण्याचा अपव्यय ही एक व्यापक समस्या आहे. हा अपव्यय कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण देखरेखीची आवश्यकता असते. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी अशा सर्व समस्येचा विचार करून हा प्रकल्प तयार केलेला आहे. हा प्रकल्प आरडिनो युनो प्लॅटफार्मवर कार्यन्वित असून, ही प्रणाली पाईप्समधून पाणी सोडण्याचे नियमन करते. कृत्रिम बुध्दिमता (एआय) शेतातील सिंचनासाठी एक नियोजित वेळापत्रक स्थापित करते आणि त्याप्रमाणे पाणी वितरण करते. याव्यतिरिक्त आयओटी आणि एआयचे एकत्रीकरण पाणी वितरणाचे रियल टाईम मॉनिटरिंग करते. ज्यामुळे व्यवस्थापन प्रणाली आणि अंतिम वापरकर्त्यांना फायदा होणार आहे.
या नावीन्यपूर्ण पध्दतीचा उद्देश शेतातील पाण्याचा अपव्यय रोखणे आणि पाणीटंचाईच्या जागतिक चिंतेला तोंड देताना संसाधनाचा प्रभावीपणे वापर सुनिश्‍चित करणे हा आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयोगी असून, या प्रकल्पाबददल संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पासाठी प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ. आर. एन. पाटील यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com