फॉरेक्स ट्रेडिंगमधून फसवणूक

फॉरेक्स ट्रेडिंगमधून फसवणूक

‘फॉरेक्स’च्या नावाखाली ३० लाखाला गंडा
तिघे संशयित पसार : पन्हाळा तालुक्यातील दोघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याच्या अमिषाने ३० लाखांची फसवणूक करून तिघे पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारही देण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये पन्हाळा तालुक्यातील दोघांचा सहभाग असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील तक्रारदाराने जून २०२२ मध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये रक्कम गुंतवणूक जादा परतावा मिळवून देण्याची माहिती घेतली होती. खानविलकर पंपाजवळील कार्यालयात बोलावून योजना सांगितल्या. यानंतर पुण्याहून आलेल्या ग्रुपच्या सदस्याने दिलेल्या योजनांमध्ये तक्रारदाराने स्वतःचे आणि भावाचे असे ३० लाख रुपये ऑगस्टमध्ये गुंतवले. दरमहा सहा टक्के कमिशनचे आमिष दाखवून रक्कम घेतली.
...
मार्केट डाऊन झाल्याचे कारण....
पैसे गुंतवून दोन महिने झालेतरी कमिशन देण्यास टाळाटाळ सुरू केली. तक्रारदाराने वारंवार तगादा लावल्याने ४ लाख १० हजार रुपये कमिशन आल्याचे सांगून एका प्लॉटची कागदपत्रे दिली. हा प्लॉट नावावर करून देण्याची खोटी बतावणी करण्यात आली. मात्र, पैसे परत करण्यास पुन्हा वेळकाढूपणा सुरू केला.
...
अनेकांना गंडा....
तक्रारदाराने या ग्रुपची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक लोकांकडून फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. तक्रारदाराकडून फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली दरमहा सहा टक्के कमिशनचे आमिष दाखवून तीस लाख रुपये घेतले. यापैकी ४ लाख १० हजार परत करून उर्वरित २५ लाख नव्वद हजार रुपयांसह संशयितांनी पोबारा केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com