बसवेश्वर मिरवणूक

बसवेश्वर मिरवणूक

82963
गडहिंग्लज : महात्मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

‘काय कवे कैलासा’च्या गजरात
महात्मा बसवेश्‍वरांची मिरवणूक
गडहिंग्लजला वचन, चित्रकला स्पर्धेचेही आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : गडहिंग्लज शहर आणि परिसरात महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘काय कवे कैलासा’च्या गजरात मिरवणूक निघाली. मिरवणूक व महाप्रसाद निडसोशी मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंग देवरुस्वामी, नूल मठाचे श्री गुरुसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी व बेलबागचे महांत सिद्धेश्‍वर महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात पार पडला.
सकाळी महादेव मंदिर आणि बसवेश्‍वर चौक येथे बसवेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. महादेव मंदिर येथे वचन स्पर्धा घेण्यात आली. चित्रकला स्पर्धा व वचन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. दुपारी महादेव मंदिर येथे जन्मोत्सव झाला. सायंकाळी पाचला महादेव मंदिर येथून स्वामीजींच्या उपस्थितीत बसव ज्योतीचे स्वागत करून मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गांवरून मिरवणूक निघाली. स्वामीजींच्या हस्ते महात्मा बसवेश्‍वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच शहरातील विविध संघटना आणि मान्यवरांनी अभिवादन केले.
चित्ररथात बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्‍वर यांचा सजीव देखावा साकरण्यात आला होता. बैलजोडी, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. महात्मा बसवेश्‍वर मिरवणुकीची सांगता बेलबाग येथे झाली. बेलबाग येथे अन्नदासोह (महाप्रसादाची) याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर विविध कार्यक्रमांसाठी समाजबंधवांसह गडहिंग्लजकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांचे आयोजन वीरशैव समाज सेवा मंडळ, बसवेश्‍वर जयंती उत्सव समिती व जीएलएस ग्रुप, श्री जडीयसिद्धेश्‍वर महिला भजनी मंडळ व विश्‍वस्त मंडळ यांनी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com