ब्राह्मण सर्व शाखीय वधू वरांचा राज्यस्तरीय मेळावा

ब्राह्मण सर्व शाखीय वधू वरांचा राज्यस्तरीय मेळावा

ब्राह्मण सर्वशाखीय
वधू-वरांचा मेळावा
कोल्हापूर : अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम,पंचरत्न वधूवर सूचक केंद्र व कोल्हापूर चित्पावन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १९) सकाळी ११ ते ४ या वेळेत ब्राह्मण सर्व पोटशाखोतील वधू-वरांचा मेळावा होणार आहे. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे मेळावा होणार आहे. ब्राह्मण समाजातील देशस्थ, कोकणस्थ, क-हाडे, सारस्वत, देवरुखे व सर्व पोट शाखेतील शिक्षित, उच्च शिक्षीत, नोकरदार, व्यावसायिक क्षेत्रातील प्रथम वर, घटस्फोटित, विधवा, विधूर, सापत्य अशा विवाहेच्छूकांचा मेळावा आहे. यावेळी पॉवर पॉईंटद्वारे स्लाईड शो व व्हिडिओ क्लिप यांचा वापर होईल. नोंदणी करणाऱ्यांचा वधू-वर विशेषांकही प्रसिध्द होणार आहे. महाराष्ट्र व आसपासच्या राज्यातील जास्तीत जास्त ब्राह्मण वधू-वरांनी नोंदणी करावी, असे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर, कार्यवाह व वधू-वर मेळावा समिती प्रमुख श्रीकांत लिमये, पंचरत्नच्या संचालिका श्रुती लिमये व व्यवस्थापक सोनिया सोनटक्के यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com